जाहिरात

Who is Aarti Sathe : भाजप प्रवक्त्या ते थेट हायकोर्ट न्यायाधीश..., कोण आहेत आरती साठे? महाराष्ट्राचं राजकारण तापलं!

राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Who is Aarti Sathe : भाजप प्रवक्त्या ते थेट हायकोर्ट न्यायाधीश..., कोण आहेत आरती साठे? महाराष्ट्राचं राजकारण तापलं!
आरती साठेंची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती वादात...

Who is Aarti Sathe : राज्याच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील कॉलेजिमयने 28 जुलै रोजी घेतलेल्या मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आरती अरुण साठे, अजीत भगवानराव कडेथांकर आणि सुशील मनोहर घोडेश्वर यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांच्या नेमणुकीनंतर वादाला तोंड फुटलं आहे. सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं चुकीचं असल्याचं मत आमदार रोहित पवारांनी मांडत त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. 

रोहित पवार यांची सकाळी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद घेत या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. आरती साठेंच्या नेमणुकीवर संजय राऊतांची सडकून टीका केली आहे. आरती साठेंची नेमणूक हे न्यायव्यवस्थेचं दुर्दैव असून न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचं कारस्थान असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे. 

काय आहे नेमका वाद? l Aarti Sathe appointed as High Court judge

दोन वर्षांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती अरुण साठे यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरती अरुण साठे यांची मुंबई हायकोर्टात नियुक्ती करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमकडून साठेंची नियुक्ती झाल्याची माहिती आहे. कॉलेजियमकडून तीन जणांची नियुक्ती त्यात आरती साठेंचं नाव आहे. आरती साठे या काही काळापूर्वी महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या राहिल्या आहेत. आरती साठेंच्या जज म्हणून नियुक्तीवर शरद पवार गटाकडून आक्षेप नोंदविण्यात आला आहे. भाजपच्या प्रवक्तेपदी राहिलेली व्यक्ती न्यायाधीश कशी असेल असा सवाल उपस्थित केला जात आहे. पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थितीत केले आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: 14 हजार झोलर पुरुषांना नोटीस, दुर्लक्ष केल्यास गुन्हा दाखल होणार

न्यायाधीश म्हणून आरती साठेंचं नाव वगळावं, रोहित पवारांची सरन्यायाधीशांकडे विनंती, 
प्रवक्तेपदी असलेली व्यक्ती न्यायाधीश कशी? 
अशा न्यायाधीशामुळे न्याय कसा मिळणार?

आरती साठे कोण आहेत?  l Who is Aarti Sathe?

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आरती अरुण साठे या मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख होत्या. त्यांची फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. साठे यांनी वर्षभरानंतर जानेवारी 2024 मध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 6 जानेवारी 2024 मध्ये त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यता आणि मुंबई भाजप कायदेशीर कक्षाच्या प्रमुख पदावरुन राजीनामा दिला. 

वडील अरुण साठे यांचं भाजप-आरएसएसशी जवळचं नातं...

आरती साठे यांचा वकील म्हणून 20 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. ते प्रामुख्याने प्रत्यक्ष कर प्रकरणांच्या तज्ज्ञ आहेत. त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI), सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधिकरण (SAT) आणि कस्टम्स, एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपीलीय न्यायाधिकरणासह मुंबई उच्च न्यायालयाच्या वैवाहिक वादांमध्ये प्रमुख वकील म्हणून काम केले आहे. आरती साठे यांचे वडील अरुण साठेदेखील एक प्रसिद्ध वकील आहेत. ते आरएसएस आणि भाजपशी संबंधित आहेत. यापूर्वी त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यही राहिल्या आहेत. 



 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com