जाहिरात
This Article is From Jun 24, 2025

Aashadhi Wari:पंढरपुरात टोकन दर्शनाचे बोगस पास घेणार असाल तर सावधान! 'हे' कृत्य करण्याआधी ही बातमी वाचा

मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून बुकींग करावेत.

Aashadhi Wari:पंढरपुरात टोकन दर्शनाचे बोगस पास घेणार असाल तर सावधान! 'हे' कृत्य करण्याआधी ही बातमी वाचा
सोलापूर:

संकेत कुलकर्णी

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 15 जून पासून टोकन दर्शन प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 24 जून रोजी टोकन दर्शनाचे बोगस पास घेऊन टोकन दर्शन रांगेत प्रवेश करणाऱ्या काही जणांना पकडण्यात आले होते. हे सर्व भाविक  हिंगोली जिल्ह्यातील होते. त्यात 6 व्यक्तींचा समावेश होता. त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शिवाय त्यांच्यावर कडक कारवाई येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंदिर समिती मार्फत दर्शनरांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार टोकन दर्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्या टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकींगची सोय आहे. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय त्याच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Pandharpur News: पंढरपूर टोकन दर्शन सुविधा 27 जूनपासून बंद होणार; मंदिर प्रशासनाचा निर्णय

मात्र, 24 जून रोजी सकाळी 9 वाजता हिंगोली जिल्ह्यातील पार्वतीबाई बापूराव बेले, लक्ष्मीबाई केशवराव बळे, संध्या मारूतीराव सातपुते, अरूणा विठ्ठलराव सातपुते, सुधाकर रामचंद्र भालेराव व केशव गणपतराव हरबळे ह्या व्यक्तीं टोकन दर्शन प्रणालीचे बोगस पास घेतले. त्यानंतर टोकन दर्शन रांगेतील प्रवेशद्वारावर आल्यानंतर नियमानुसार पासची तपासणी केली असता, पास बोगस असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे त्यांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे  यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे.

ट्रेंडिंग बातमी - Navi Mumbai News: आंघोळ करताना अल्पवयीन तरुणीचा व्हिडीओ काढला, शरीरसंबंधासाठी दबाव, पुढे जे घडलं ते...

मंदिर समितीच्या वतीने असे आवाहन करण्यात येते की, टोकन दर्शन प्रणालीचे पासेस मंदिर समितीच्या https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून बुकींग करावेत. जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. याशिवाय, सदरचा पास संपूर्णत: निशुल्क आहे, असे यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले. मात्र जे बोगस पास घेवन दर्शन रांगेत येतील त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मंदीर समितीने दिला आहे. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com