जाहिरात

Abhishek Ghosalkar Death: 'जैसा अभिषेक को मारा वैसा...', पतीच्या हत्येनंतर आता तेजस्वी घोसाळकर यांना धमकी

Abhishek Ghosalkar Murder Case: अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

Abhishek Ghosalkar Death: 'जैसा अभिषेक को मारा वैसा...', पतीच्या हत्येनंतर आता तेजस्वी घोसाळकर यांना धमकी

Mumbai News:  शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरुन गेला होता. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबूक लाईव्ह करत गोळ्या झाडून खून करण्यात आला त्यानंतर आरोपीनेही आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता खळबळजनक अपडेट समोर आली असून अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दहिसर येथील निष्ठावंत शिवसैनिक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकाने लालचंद यांना ठार मारण्याबाबतचा संदेश पोस्ट केला होता. याप्रकरणी लालचंद पाल यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दहिसरच्या कांदरपाडा परिसरात राहणारे लालचंद पाल यांचे किराणा मालाचे दुकान आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक असून सध्या ते शिवसेना शाखा क्र. 1 येथे कार्यालय प्रमुख म्हणून काम करत आहेत. 1 एप्रिल रोजी गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका मोबाईलधारकाने लालचंद यांना उद्देशून एक आक्षेपार्ह पोस्ट टाकली. 'जैसा अभिषेक को मारा वैसा लालचंद को भी मारेंगे' असा इंग्रजीमध्ये संदेश पोस्ट करण्यात आला होता. त्याचबरोबर Lalchand inko Dekhkar Sudhar Ja, Isko biwi ko mat marva dena Lalchand असाही संदेश या ग्रुपमध्ये टाकल्याची माहिती समोर आली आहे. 

(नक्की वाचा-  महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?)

माझा मित्र रियाज हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. जेव्हा आम्ही तो संदेश पाहण्याचा प्रयत्न केला असता तेव्हा तो ग्रुपमधून डिलीट करण्यात आला होता. त्या ग्रुपचा अॅडमिन आबिद शेख हा असून यालादेखील त्या मेसेजसंदर्भात कल्पना असावी, असे लालचंद पाल यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे. या धमकीच्या संदेशामुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला असून माझे कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी लालचंद यांनी केली आहे. लालचंद हे दिवगंत अभिषेक घोसाळकर यांच्या अत्यंत जवळचे सहकारी होते. तसेच लालचंद यांचे घोसाळकर कुटुंबीयांशी घरगुती संबंध आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात लालचंद हे प्रमुख साक्षीदार आहेत. त्यामुळे लालचंद यांना अशा प्रकारे धमकावणे गंभीर बाब आहे. लालचंद हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, पण त्याचबरोबर आमचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धमकीचा संदेश पोस्ट करणाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर कुटुंबीयांनी केली आहे. 

(नक्की वाचा- Shirdi News : कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)