नंदूरबारमध्ये दोन बाईकची जोरदार धडक, उपसरपंचासह चार जणांचा जागीच मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन बाईक समोरा-समोर धडकून हा भीषण अपघात झाला. म्हसावदहून पाटळदा गावाकडे जाणाऱ्या दोन बाईकमध्ये ही धडक झाली.

(नक्की वाचा- विदर्भात अवकाळीचा तडाखा; बुलडाणा, वाशिम, अकोल्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं)

मृत व्यक्तींमध्ये इस्लामपूरच्या उपसरपंचाचा देखील समावेश आहे. दोन बाईकची धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बाईकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर एक बाईक तर जळून खाक झाली आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा भीषण अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

(नक्की वाचा- VIDEO: मलेशियात नौदलाच्या 2 हेलिकॉप्टरची हवेत धडक, 10 जणांचा मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बाईकवरील दोन युवक दारुच्या नशेत होते. त्यांची बाईक अनियंत्रित होऊन समोरील बाईकला धडकल्याची माहिती समोर येत आहे.

मृतांची नावे 

  1. अतिश दशरथ बर्डे (वय 30 वर्ष, राहणार उमर्टी तालुका शहादा)
  2. उखड्या सुपा पवार (वय 51 वर्ष, राहणार टवळाई तालुका शहादा) 
  3. स्वराज सुरेश ठाकरे ( वय 33 वर्षे, राहणार फत्तेपूर शहादा)
  4. लतीफ नवी खाटीक (वय 70 वर्ष, राहणार इस्लामपूर तालुका शहादा)
Topics mentioned in this article