प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात एका विचित्र अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दोन बाईक समोरा-समोर धडकून हा भीषण अपघात झाला. म्हसावदहून पाटळदा गावाकडे जाणाऱ्या दोन बाईकमध्ये ही धडक झाली.
(नक्की वाचा- विदर्भात अवकाळीचा तडाखा; बुलडाणा, वाशिम, अकोल्याला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं)
मृत व्यक्तींमध्ये इस्लामपूरच्या उपसरपंचाचा देखील समावेश आहे. दोन बाईकची धडक इतकी जोरदार होती की दोन्ही बाईकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर एक बाईक तर जळून खाक झाली आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा भीषण अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(नक्की वाचा- VIDEO: मलेशियात नौदलाच्या 2 हेलिकॉप्टरची हवेत धडक, 10 जणांचा मृत्यू)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बाईकवरील दोन युवक दारुच्या नशेत होते. त्यांची बाईक अनियंत्रित होऊन समोरील बाईकला धडकल्याची माहिती समोर येत आहे.
मृतांची नावे
- अतिश दशरथ बर्डे (वय 30 वर्ष, राहणार उमर्टी तालुका शहादा)
- उखड्या सुपा पवार (वय 51 वर्ष, राहणार टवळाई तालुका शहादा)
- स्वराज सुरेश ठाकरे ( वय 33 वर्षे, राहणार फत्तेपूर शहादा)
- लतीफ नवी खाटीक (वय 70 वर्ष, राहणार इस्लामपूर तालुका शहादा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world