जाहिरात
2 days ago

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध अद्यापही सुरू आहे. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा दिसला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सैफच्या मोलकरणीला ओलीस ठेवून एक कोटींची मागणी केली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीच्या आरोपाखाली अटक केलेल्या वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर उद्या 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. 

टोरेस प्रकरणातील हवाला ऑपरेटरला आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक

टोरेस प्रकरणातील हवाला ऑपरेटरला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अल्पेश खरा असं या हवाला ऑपरेटरचं नाव आहे. अल्पेश हा टोरेसचा विदेशातील आणि भारतातील व्यवहार बघत होता. 

त्या आरोपीला पोलिसांनी पुन्हा चौकशीसाठी आणले

सैफ हल्ल्या प्रकरणी सकाळी पकडलेल्या संशयित आरोपीला पोलिस पुन्हा पोलिस स्टेशनला घेऊन आले आहेत. काही वेळासाठी  पोलिस या संशयित आरोपीला बाहेर घेऊन गेले होते. नेमकं या व्यक्तीला कुठे घेऊन गेले होते याबाबतीत पोलिसांकडून कोणतीही माहिती नाही. त्याची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.  

एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार

दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5 हजार लालपरी बसेस खरेदी करणार आहे. असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. एस टी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार आहे. परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला. 

Live Update : परकीय गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री करणार दावोसची वारी!

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी झाले होते.  आताही या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम दावोस दौऱ्यात राहणार आहेत. अनेक जागतिक नेत्यांच्याही ते भेटी घेणार आहेत. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.

Live Update : परकीय गुंतवणुकीसाठी मुख्यमंत्री करणार दावोसची वारी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 लोकांची केली चौकशी

सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 लोकांची चौकशी करण्यात आली आहे.  यात सैफच्या घरात काम करणारे, बिल्डिंगचे सुरक्षा रक्षक, घरात सामान द्यायला येणारे नोकर या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी घटनेच्या दिवशी या सर्व व्यक्ती कुठे होत्या याची देखील माहिती घेतली आहे.  त्या दिवशीचे या सर्व व्यक्तींचे फोन कॉल रेकॉर्डची माहिती घेण्यात आली.

आमदार सतीश चव्हाण शरद पवारांना सोडचिठ्ठी देणार

आमदार सतीश चव्हाण यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या शिर्डीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना सोडून त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी आमदार सतीश चव्हाण यांचे सहा वर्षासाठी निलंबन केलं होतं. सतीश चव्हाण हे पदवीधर मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी गंगापूर विधानसभा क्षेत्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. 

दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. त्यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहेत. त्यात 30  उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. 

पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी करवाई

पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 15  लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यात 77 ग्राम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ बाळगल्याने आणि त्याची विक्री करण्याच्या हेतूने हुसैन नूर खान आणि फैजान अयाज शेख आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. 

Live Update : ताब्यात घेतलेल्या आरोपीचा सैफ अली खानच्या हल्ल्याशी संबंध नाही!

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचा सैफ अली खानच्या हल्ल्याशी संबंध नाही. त्याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र चौकशी केली असता त्याचा सैफ अली खानशी संबंध नसल्याचं समोर आलं आहे. 

Pune Nashik Accident: पुणे- नाशिक महामार्गावरील अपघातात 9 ठार, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मी पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे.

Pune News: गृहराज्यमंत्री योगेश कदम आज पुण्यात, पोलीस विभागाचा घेतला आढावा

गृहराज्यमंत्री योगेश कदम आज पुण्यात

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून  पुणे पोलीस विभागाचा आढावा

गृहराज्य मंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीला पोलीस आयुक्तालयात सुरुवात

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला  उपस्थितीत

पुणे पोलीस आयुक्तालयात योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली बैठक

पुणे शहरातील गुन्हेगारी बाबत गृहराज्यमंत्री घेणार आढावा

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था या संदर्भात सुद्धा बैठकीत होणार चर्चा

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरहे देखील या बैठकीला उपस्थित

BJP RSS Meeting: उद्या आरएसएस आणि भाजपची मुंबईत बैठक

उद्या संघ आणि भाजप दरम्यान महत्त्वाची समन्वय बैठक मुंबईत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील भाजप चे मंत्री यांची संघाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. ही बैठक दोन दिवस चालणार अशी अपेक्षा आहे. स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होतील अशी अपेक्षा आहे, त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा काही बैठकी झाल्या होत्या. यावर नागपुरात प्रश्न विचारला असता महसूल मंत्री नितीन चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर होत नसून विचार परिवारात नव्या मंत्र्यांचा परिचय करून देणे तसेच जनतेच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन मिळवणे या साठी होत असल्याचे सांगितले.  विशेषतः आदिवासी विकास आणि सामाजिक कल्याण विभागाशी संबंधित मुद्द्यांवर या बैठकीत लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! 10,35,000 रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त

पुणे पोलिसांची बनावट नोटांच्या रॅकेट विरोधात मोठी कारवाई:

तब्बल 10,35,000 रुपये किंमतीच्या 2070 बनावट नोटा पुणे पोलिसांकडून जप्त

सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक रात्रीच्या वेळी पुणे सातारा रोडवर गस्त घालत असताना एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याच्या चौकशी दरम्यान त्याच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटांची गड्डी सापडली.

त्यास अटक करून पुढील चौकशीमध्ये बनावट नोटा आरोपीस पुरवल्याबद्दल नवी मुंबईतील ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा येथून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. यादरम्यान रुपये 10, 35,000 किंमतीच्या 2070 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे 

Saif Ali Khan Attack Update: सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात

अभिनेता सैफ अली खानवरील झालेल्या हल्ल्याने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून या हल्ल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.  सैफ अली खानवरील हल्ल्यावेळी घरात सीसीटीव्हीमध्ये एक आरोपी कैद झाला होता. याच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 

Latur News: किरकोळ वादावरून बस कंडक्टरला जबर मारहाण; कर्मचारी आक्रमक

रहाण करण्यात आली आहे या मारहाणी मध्ये कंडक्टर गंभीर जखमी झाला आहे. औसा ते बिरवली जाणारी मुक्कामी बस ही कोरंगळागावाजवळ आली असता, कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये सीट वर बसण्याच्या करणावरून किरकोळ वाद झाला होता.त्यात प्रवाशांनी बसच्या खाली उतरत कंडक्टरच्या डोक्यात दगड घालत गंभीर जखमी करून जबर मारहाण केली आहे.. गंभीर असलेल्या बस कंडक्टर वरती लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. दरम्यान मारहाण करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी

औसा बस आगारातील ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बस आगारातच आंदोलन सुरू केला आहे जोपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत औसा बस आगारातून एकही बस बाहेर जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय..

Pune News: एनसीपी राज्य अधिवेशनाकडे छगन भुजबळांची पाठ ?

एनसीपी राज्य अधिवेशनाकडे छगन भुजबळांची पाठ ?

उदयापासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे अधिवेशन 

अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहण्याची शक्यता कमी 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ अनुपस्थित राहण्याची शक्यता  असल्याचं समजते 

मंत्री धनंजय मुंडे मात्र शिर्डी येथील अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याच समजते - 

 सूत्रांची माहिती

Kolhapur News: शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यव्यापी आंदोलन

 शक्तिपीठ महामार्गाविरोधात २४ जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.  शक्तिपीठ महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीकडून या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. शक्तिपीठ महामार्गबाधित बारापैकी दहा जिल्ह्यांतील समितींच्या प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक झाली. यात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nashik Accident Update: नाशिक अपघातात मोठी अपडेट! मृतांची संख्या 8 वर

मुंबई नाशिक महामार्ग उड्डाणपुलावर द्वारका परिसरात चार दिवसापूर्वी घडलेल्या अपघातात मृतांची संख्या  8 वर...

बुधवारी सायंकाळी दहावीत शिकणारा अरबाज शाहरुख खान वय वर्ष 15 याचा देखील या घटनेत मृत्यू झाला. अरबाज हा स्वामी विवेकानंद शाळेत चा हुशार विद्यार्थी होता आणि आज त्याचा शाळेचा शेवटचा दिवस होता. मात्र त्याचा देखील ह्या घटनेत मृत्यू झाला, झाला असून मोरवाडी परिसरात शोक काळात पसरली आहे.. या घटने प्रकरणी ट्रक चालक मालक व ट्रक मधील माल असलेल्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर परिवहन विभागाने देखील रिफ्लेक्टर लावण्याची कारवाई सुरू केलेली आहे..

संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्वीस्ट! सीआयडी अधिकारी बदलला

विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिकचाच नातेवाईक : सूत्रांची माहिती

वाल्मिक कराडच्या मोबाईलमधून जप्त केलेलं सिमकार्ड विदेशात रजिस्टर 

वाल्मिकचा आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती देखील विदेशात जाऊन बसलाय : सूत्र

वाल्मिकची जवळच्या नातेवाईकाच्या नावे विदेशात गुंतवणूक : सूत्र

सीआयडीकडून कराडची विदेशात काही संपत्ती आहे का याचा शोध सुरू

Santosh Deshmukh Murder CASE: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडीत बदल, तपास अधिकारी बदलला

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला आहे. यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लिडर दाखविले आहे तर वाल्मीक कराडला गँगचां सदस्य आहे.तसेच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारीदेखील बदलण्यात आले आहेत.

हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. त्यांच्या जागी आता अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील  या तपास करणार  आहेत.. त्यामूळे  सी आय डी मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत..आता यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध सीआयडी घेत आहे. त्यामूळे आरोपींनी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

Jalna News: राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नाव बदलण्यास मान्यता

राज्य शासनाने 15 जानेवारी 2025 रोजी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यामार्फत शासन निर्णय काढत राज्यातील 132 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नाव बदलण्यास मान्यता देण्यात आलीय.यात भोकरदन शहरात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माजी खासदार स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरि दानवे यांचे नाव देण्यात आलंय.मराठवाडा मुक्ती संग्रामात 13 महिन्याच्या लढ्यात खासदार पुंडलिक हरी दानवे यांचा महत्वाचा वाटा होता त्याच बरोबर जिल्ह्यातील भाजपाचे पहिले खासदार म्हणून निवडून येण्याचा खासदार स्वर्गीय पुंडलिक दानवे यांचा होता एका संयमी राजकीय नेत्याचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाला देण्यात आल्याने जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत केल्या जात आहे...

Walmik Karad: वाल्मीक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या सुनावणी

एकीकडे वाल्मीक कराड याने दाखल केलेल्या मंडळी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आधीच सरकारी वकील जे. बी.शिंदे यांच्या माध्यमातून सीआयडीने याची उत्तर दाखल केले आहे. वाल्मीक कराडच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा विरोध आहे.

तर दुसरीकडे पुण्यातून अटक केलेले सुदर्शन घुले,सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी उद्या संपत असून यासह प्रतीक घुले, महेश केदार,जयराम चाटे याची 12 दिवसाची पोलीस कोठडी उद्या संपत असल्याने या सर्वांना उद्या केज येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता उद्याच्या सुनावणीत सरकारी वकील काय बाजू मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Akola News: पिंजर येथील कॅल्शियम विटामिन गोळीमधील स्टेपलर पिन गोळीचा नमुना

अकोल्याच्या पिंजर येथील अंगणवाडीतून कॅल्शियम विटामिन च्या गोळीतून स्टेपलरची पिन निघाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होतीय. दरम्यान याबाबतची बातमी एनडीटीव्ही मराठीने प्रकाशित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन जागा झालं आणि कॅल्शियम विटामिन या गोळीच्या नमुना विश्लेषणासाठी आज दुपारी घेण्यात आलाय.. त्यामध्ये प्रथमदर्शनी कॅल्शियमच्या गोळीत तार असल्याचे दिसून आलेय. आता हा नमुना घेऊन प्रयोगशाळेला पाठवला जाणार, तर उर्वरित साठा हा प्रतिबंधित करून सुरक्षित ठेवलाय आणि त्याचा वापर न करण्याच्या सूचना संबंधित औषध निर्माण प्रशासनाला दिलेय.

Beed News: जिल्हाधिकाऱ्यांचा अवैध वाळू वाहतूकदारांना दणका चाळीस हायवाना दोन हजार नोटीस बजावल्या जाणार

 सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचे वास्तव समोर आले होते.त्यातच आता बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बाळूमाफ यांना दणका दिल्याचे दिसून येत आहे.गेवराईतील पाडळशिंगी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 40 हायवा मालकांना 2000 नोटीसा पाठविण्याची कार्यवाही आज पासून सुरू होणार आहे. यावर हायवा मालकांना सात दिवसाच्या आत आपले म्हणणे मांडावे लागणार आहे. 

मागील वर्षभराच्या कालावधीत रितीचे वाहतूक करणारे टिप्पर दिसून आले आहेत तेवढ्या वेळा म्हणजे कोणाला 100 तर कोणाला 150 अशा नोटीसा दिल्या जाणार आहेत. आता प्रत्येक नोटीसचा खुलासा हायवा मालकांना करावा लागणार आहे. त्यामुळे तेव्हा मालकांच्या अडचणी वाढणार आहेत. याआधी हायवा मालकांचे म्हणणे ऐकण्याआधी कारवाई केल्याचा मुद्दा न्यायमूर्ती समोर मांडण्यात आला होता. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वाहनधारकांना बजावलेल्या नोटीसा मागे येण्याची भूमिका घेतली होती. मात्र आता ही कारवाई नव्याने मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे.

Amravati News: चार दिवसात 3 हजार 172 अर्ज निघाली, पोलीस आयुक्तांकडून 'ऑन द स्पॉट' केलं तक्रारीचे निवारण

अमरावती शहर पोलीस मुख्यालय हद्दीत दहा पोलीस स्टेशन येतात, यामध्ये वर्षभरात 3 हजार 719 पोलीस तक्रार पडून होत्या, छोटे घरगुती भांडण, घरा शेजारचे भांडण, सोसायटीमधील तंटे, छेडखाणी, शेतीचे वाद यासह विविध तक्रारी प्रलंबित असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्त  नवीनचंद्र रेड्डी यांनी अमरावतीमध्ये तक्रार निवारण केंद्र उभारत चार दिवसात तब्बल 3 हजार 172 अर्ज निकाली काढले, पोलिसांनी अर्जदार  व गैरअर्जदार या दोघांना एकत्र बसून दोघांमध्ये समवेत घालून आणला व तक्रारीचा निपटारा केला,अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी  यांनी चार दिवस तक्रार निवारण सुरू केल्याने यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये  पडून राहणाऱ्या तक्रारी ऑन द स्पॉट  तक्रारींचं निवारण करण्यात आलं, त्यामुळे वर्षानुवर्ष पडून राहणाऱ्या तक्रारीला अखेर न्याय मिळाल्याने अर्जदार व गैरअर्जदार या दोघांना  न्याय मिळाल्याची भावना  बोलून दाखवली 

Live Update : संतोष देशमुख हत्येच्या सखोल चौकशीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्यसमन्वय सचिन सोमवंशी यांचे उपोषण

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या सखोल चौकशी सह या घटनेचा निवृत्त न्यायाधीशानमार्फत तपास करून आरोपींची नार्कोटेस्ट  करण्याच्या मागणीसाठी पाचोरा येथे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन समोशी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 

Live Update : वाल्मीक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या सुनावणी

एकीकडे वाल्मीक कराड याने दाखल केलेल्या मंडळी प्रकरणातील जामीन अर्जावर उद्या केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आधीच सरकारी वकील जे. बी.शिंदे यांच्या माध्यमातून सीआयडीने याची उत्तर दाखल केले आहे. वाल्मीक कराडच्या खंडणीच्या गुन्ह्यातील जामिनासाठी सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा विरोध आहे.

Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट

- आजपासून बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू

- बांगलादेश सरकारकडून परिपत्रक जारी

- महाराष्ट्रातून कांद्याची सर्वाधिक बांगलादेशमध्ये होते निर्यात

- कांद्याच्या भावावर परिणाम होण्याची शक्यता

Listen to the latest songs, only on JioSaavn.com