जाहिरात

manikrao kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद अन् आमदारकी जाणार? आज फैसला

त्यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवारही कायम असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

manikrao kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद अन् आमदारकी जाणार? आज फैसला

प्रांजल कुलकर्णी, नाशिक: अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या अडचणीत सापडले असून त्यांच्या निकालाचा फैसला आज होणार आहे. 20 फेब्रुवारीला नाशिक कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 2 वर्ष कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाला आव्हान देत कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

24 आणि फेब्रुवारीला कोकाटे यांच्या वकीलांची आणि सरकारी वकीलांचा युक्तीवाद पार पडला होता आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवत 1 मार्च ही तारीख दिली होती, कोकाटे यांच्या वकीलांनी केलेली शिक्षेवरील स्थगितीची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली होती. आज निकाल येणार असल्याने कोकाटे यांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. त्यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवारही कायम असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

(नक्की वाचा-  Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)

आमदार माणिकराव कोकाटे यांची राजकीय कारकिर्द: 

 1978 - एच पी टी कॉलेजच्या  जी. एस. पदी
14 ऑगस्ट 1991 - युवक काँग्रेस  जिल्हाध्यक्ष
1992- जिल्हा परिषद सदस्य
1993- 1996 पंचायत समिती सभापती
1996 पासून आज तगायत 24 वर्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक
जिल्हा बँकेत तीनदा चेयरमन म्हणून नियुक्ती
1997 साली पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य
1997 - कृषी व पशु संवर्धन सभापती नाशिक जिल्हा परिषद
1999 साली पहिल्यांदा आमदार
2994 साली सलग दुसऱ्यांदा आमदार
1 जानेवारी 2008 साली सिन्नर दूध उत्पादक संघाची स्थापना व आज तगायत संचालक व चेयरमन 
2008 09- महाराष्ट्र शिखर बँक संचालक
2009 साली सलग तिसऱ्यांदा आमदार
2014 विधानसभा निवडणुकीत  पराभव
2019- ला अपक्ष लोकसभा निवडणूक लढवून पराभव
2019- विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आमदार.
सिन्नर विभागीय दूध संघाचे चेअरमन
2024-  विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी

(नक्की वाचा - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: