जाहिरात

Ahilyanagar Election: कार्यालयाबाहेर लिंबू, जादूटोणा.. भाजप-शिंदे गटात जोरदार जुंपली, नेमकं काय घडल?

अहिल्यानगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर भाजप उमेदवाराने जादूटोणा केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. 

Ahilyanagar Election: कार्यालयाबाहेर लिंबू, जादूटोणा.. भाजप-शिंदे गटात जोरदार जुंपली,  नेमकं काय घडल?

प्रसाद शिंदे, अहिल्यानगर:

Ahilyanagar Municiple Election 2026:  राज्यभरात महापालिका निवडणुकांचे धुमशान सुरु आहे. महानगरपालिका निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच जादूटोण्यासारखेही प्रकार घडत आहेत. अहिल्यानगरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारावर भाजप उमेदवाराने जादूटोणा केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. 

भाजप कार्यालयाबाहेर जादूटोणा..?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आता प्रचाराच्या पातळीसोबतच 'जादूटोण्या'चे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार अश्विनी जाधव यांनी भाजप उमेदवार सागर मुर्तडकर यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर लिंबू टाकून जादूटोणा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Bhiwandi Election 2026: लाठ्याकाठ्या, खुर्च्या अन् दगड.. भाजप- काँग्रेस गटात तुफान राडा; भिवंडीत दोन गट भिडले

या घटनेचा एक कथित व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावा करण्यात आला असून, यामुळे महायुतीतील दोन मित्रपक्षांच्या उमेदवारांमध्ये ठिणगी पडली आहे.रात्रीच्या वेळी अश्विनी जाधव यांनी मुद्दाम कार्यालयाबाहेर लिंबू टाकून अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ​भाजप उमेदवार सागर मुर्तडकर यांनी केला आहे. 

शिंदे गटावर आरोप

या प्रकारामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. प्रचारात मुद्यांची लढाई होण्याऐवजी अशा अंधश्रद्धेचा आधार घेतला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ​दुसरीकडे, अश्विनी जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

"आजचे तंत्रज्ञान खूप प्रगत आहे, तो व्हिडीओ बनावट असून माझा अपप्रचार करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे कारस्थान आहे," असा पलटवार त्यांनी केला. पराभव समोर दिसत असल्याने विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सत्यता पोलीस तपासातच स्पष्ट होणार असली तरी, या 'लिंबू' प्रकरणामुळे अहिल्यानगरच्या निवडणुकीत मात्र चांगलीच रंगत आली आहे. 

Maharashtra Election 2026 : महाराष्ट्रातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी किती उमेदवार रिंगणात? पाहा संपूर्ण यादी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com