
एअर इंडियाने त्यांच्या अमरावतीतील फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशनसाठी (FTO) 31 सिंगल-इंजिन विमानांसह 34 ट्रेनर विमानांची ऑर्डर दिली आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात ही विमाने मिळणे अपेक्षित आहे. अमरावतीत दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन उभारणी केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एअर इंडियाने गुरुवारी 'X' अकाऊंटवर पोस्ट करत म्हटलं की, पुढील वर्षी महाराष्ट्रातील अमरावती येथील आमच्या फ्लाइंग स्कूलसाठी आम्ही 34 ट्रेनर विमानांची ऑर्डर दिली आहे. वैमानिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि भारताची विमान वाहतूक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
अमरावती येथील FTO येथे , एअर इंडिया 10 एकरांवर एक अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था विकसित करत आहे, ज्यामध्ये ग्लोबल अकॅडमी, हॉस्टेल, डिजीटल ऑपरेशन सेंटर आणि डिजिटल क्लासरूम असणार आहेत. उच्च सुरक्षा मानकांसह सर्वोत्तम श्रेणीतील प्रशिक्षण देण्यासाठी FTO ची निर्मिती केली जात आहे.
(नक्की वाचा- हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)
Air India's Game Changer:
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 19, 2024
All set to establish South Asia's Largest Flying Training Hub in Amravati!
Air India charts a bold course toward redefining the future of aviation!
The decision to place an order for 34 trainer aircraft and establish South Asia's largest Flying Training… pic.twitter.com/JciJ7YsT0N
देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "एअर इंडियाचा गेम चेंजर: अमरावतीमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग हब स्थापन करण्यासाठी सज्ज! एअर इंडियाने वैमानिकांचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. 2025 च्या मध्यापर्यंत 34 ट्रेनर विमानांची ऑर्डर देण्याचा आणि दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन अमरावतीमध्ये स्थापन करण्याचा निर्णय हा खरा गेम चेंजर आहे. हा दूरदर्शी उपक्रम केवळ जागतिक विमान वाहतूक उद्योगात भारताचे स्थान मजबूत करणार नाही तर आर्थिक चालना देईल, रोजगार निर्मिती सक्षम करेल, वैमानिक होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी नवीन संधी देईल. अत्याधुनिक सुविधा, डिजिटली सक्षम कॅम्पस आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण इकोसिस्टमसह एअर इंडिया विमान वाहतूक उत्कृष्टतेच्या नवीन युगाचा पाया रचत आहे."