जाहिरात

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून अकोल्याची ऐश्वर्या कशी वाचली?

Air India Plane Crash : ऐश्वर्या तोष्णीवाल असं या विमान अपघातातून बचावलेल्या मुलीचे नाव आहे. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून अकोल्याची ऐश्वर्या कशी वाचली?

Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या भीषण विमान अपघातात 265 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये विमानातील 242 पैकी 241 जणांचा समावेश आहे. तर विमान ज्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळलं तिथे अकोल्याची मुलगी देखील उपस्थित होती.  

(नक्की वाचा - Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट)

ऐश्वर्या तोष्णीवाल असं या विमान अपघातातून बचावलेल्या मुलीचे नाव आहे. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ऐश्वर्याने सांगितलं की, अपघात झाला त्यावेळी ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. तिने तातडीने खिडकीतून खाली डोकावून पाहिलं तर समोर तिला सर्वत्र धूर दुसत होता. 

(नक्की वाचा - Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना टाटाकडून 1 कोटींची नुकसानभरपाई, आणखी काय म्हणाले?)

काही कळायच्या आत तिने तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अशावेळी तिने स्वतःला चादरीत लपेटलं आणि धुरातून मार्ग काढत स्वतःचा जीव वाचवला. या दरम्यान तिच्या शरीरावर किरकोळ जखमा झाले आहेत. चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याचे निशाण आले. 

दरम्यान, ज्या हॉस्टेलवर विमान कोसळले, तेथील 20 ते 25 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ऐश्वर्याने लगेच आपल्या वडिलांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. थोडक्यात बचावलेल्या ऐश्वर्याने म्हटलं की, "माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी दुर्घटना मी अनुभवली. हा भयावर क्षण मी कधीच विसरू शकणार नाही."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com