Solapur News: अजित पवारांना मोठा धक्का; सोलापूरचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील एका महत्त्वाच्या माजी आमदाराला भाजपने आपल्याकडे ओढल्यास, अजित पवार यांच्या एनसीपी पार्टीत पुन्हा नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Solapur News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजन पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राजन पाटील यांची ओळख अजित पवार यांचे जवळचे समर्थक म्हणून आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातील एका महत्त्वाच्या माजी आमदाराला भाजपने आपल्याकडे ओढल्यास, अजित पवार यांच्या एनसीपी पार्टीत पुन्हा नाराजी वाढण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Jalna News: महापालिका आयुक्त रंगेहाथ ACB च्या जाळ्यात, लाचेची रक्कम ऐकून घाम फुटेल)

राजकीय खेळी आणि मोहोळमधील समीकरणे

राजन पाटील हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आहेत. जिथे सध्या शरद पवार यांच्या एनसीपी पार्टीचे राजू खरे आमदार आहेत. राजन पाटील यांची ओळख राजू खरे यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून आहे.

माजी आमदार राजन पाटील यांना एनसीपीतून भाजपमध्ये आणण्यामागे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची राजकीय खेळी असल्याचे मानले जात आहे. जयकुमार गोरे यांनी ही फिल्डिंग लावली असून, भाजपला मोहोळ आणि सोलापूर जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी ही रणनीती आखली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर भाजपने ही खेळी खेळल्यास, राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Advertisement

Topics mentioned in this article