रेवती हिंगवे, पुणे: विधानसभा निवडणुकांमध्ये लागलेल्या धक्कादायक निकालानंतर विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएम मशिनकडे बोट दाखवले असतानाच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यामध्ये ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनस्थळी जाऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या ईव्हीएमवरील आरोपांना उत्तर दिले.
काय म्हणाले अजित पवार?
काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. काही सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत. देखील उमेदवार होतो. 21 डिसेंबर सर्वात लहान दिवस असतो. आता थंडी आहे. मी याबाबत निवडणूक आयोगालाही बोललो होतो. सायंकाळ लवकर होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर लवकर अंधार होतो.म्हणून लाईट लावण्याचे आवाहनही आम्ही केले होते. सहापर्यंत रांगेत आलेल्या सर्वांचे मतदान करुन घ्यावे लागते. त्यामुळे पाचनंतर मतदानाचा टक्का वाढला... असं अजित पवार म्हणाले
लोकसभेला महाविकास आघाडीच्यी 31 जागा आल्या आमच्या १७ जागा आल्या. त्यावेळी ईव्हीएमबद्दल कोणी बोलले नाही. आम्ही पण बोललो नाही. माझ्याच बारामती मतदारसंघाचे उदाहरण सांगतो. लोकसभेवेळी माझा उमेदवार 48 हजारांनी पराभूत झाला होता. आता विधानसभेला मी 48 हजाराचे लीड तोडून एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. या जनतेचा कौल आहे. कौल आहे. जनतेने कौल बदलला त्याला आम्ही काय करणार.. असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा: अवघ्या 5 दिवसात संसार संपला! नववधूसोबत भयंकर घडलं; मन सुन्न करणारी घटना
जनतेचा कौल आपण मान्य केले पाहिजे. आजपर्यंत तु्म्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यामध्ये आपण चर्चा केली आहे. काहीजण पराभूत उमेदवार म्हणतात आमच्यामुळे झाला. तसं असेल तर सिद्ध करुन दाखवा. साडे- चार पाचच्या पुढे आतमध्ये घेतलेल्या लोकांचे मतदान वाढले. त्यात आमचा काय दोष आहे. मतदारांनी कधी मतदानाला यायचे, यामध्ये आम्ही काय करणार, असंही ते म्हणाले.
आपल्याइकडे इतर राज्याप्रमाणे बुथ कॅप्चरिंग वगेरे चालत नाही. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने लाभ देण्याचे ठरवले.आपल्या सरकारचे साडे सहा हजार कोटी बजेट होते. त्यामधून 75 लाख हजार बाजूला काढा, ते लाडक्या बहिणीला द्यायचे आहेत, असं सांगितलं. हा पैसा जनतेचाच आहे.आम्ही फक्त 1500 दिले, त्यांच्य जाहीरनाम्यात 3000 होते. त्यांनीही प्रलोभने दाखवली, असे म्हणत अजित पवार यांनी मविआवर जोरदार टीका केली.
महत्वाची बातमी: मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदेंच्या गावातल्या गावकऱ्यांना काय वाटतं?