Rohit Pawar Press Confernce on Ajit Pawar plane crash : रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवारांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात बारामती येथे निधन झालं. त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अनेक संशय व्यक्त केला जात आहे. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत विमानाच्या कंपनीवर संशय व्यक्त केला आहे.
27 जानेवारीपचा प्लान का बदलला?
अपघाताच्या आदल्या दिवशी २७ जानेवारीपर्यंत अजित पवारांना कारने जाण्याचा प्लान होता. सायंकाळी पक्षातील काही नेते आणि कार्यकर्ते भेटणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. या भेटीनंतर वेळापत्रकानुसार दादा २७ जानेवारीला सायंकाळी पुण्याला निघणार होते. त्यांचा ताफा देखील लागला होता. पण एक मोठे नेते दादांना भेटण्यासाठी येणार होते. मात्र त्यांना उशीर झाला आणि चर्चा उशीरापर्यंत सुरू राहिल्याने दादांना गाडीने जाता आलं नाही आणि दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचं ठरवलं, असं रोहित पवारांनी सांगितलं.
पूर्व विदर्भातील नेता अन् ती फाईल...
पूर्व विदर्भातील हे नेते एका फाइलवर दादांची सही घेण्यासाठी आले होते. मात्र ती फाइल घरी नव्हती. मंत्रालयाच्या कार्यालयात होती. त्या फाईलवर सही करणं अत्यंत आवश्यक असल्याचं पूर्व विदर्भातील त्या नेत्याने सांगितलं. पक्षातील बडा नेता सांगत असल्यामुळे दादा थांबले. शेवटी सायंकाळी मंत्रालयातून फाइल आणण्यात वेळ गेला. यावेळी सायंकाळी एका राजकीय कन्स्लटंट रद्द करण्याबाबत चर्चा सुरू होती. या राजकीय कन्स्लटंटचं कोट्यवधींचं बजेट होतं. ते रद्द करण्याबाबत पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. यापूर्वीही दादांनी सर्वेसंदर्भात त्या राजकीय कन्स्लटंटची कानउघडणी केली होती. तुम्ही आम्हाला राजकारण शिकवू नका असं ते त्यांना म्हटल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world