
योगेश शिरसाट, अकोला: अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वृत्ती मोठ्या प्रमाणात डोके वर काढू लागली आहे. यावर पोलिसांचा अंकुश लावण्या कुठेतरी कमी दिसू येऊ लागले आहे. आता तर कायद्याचे अभ्यासक असलेला वकील यांनी चक्क वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाच अकोल्याच्या न्यायालयात विनयभंग केला आहे. महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्या वकिलाला पाच दिवसाची कोठडी मिळाली. जिल्हा व सत्र न्यायालयात एका वरिष्ठ पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्याचा काही दिवसापासून मानसिक छळ करून विनयभंग हा कायद्याचा अभ्यासक असलेला वकिलानेच केला असल्याचा प्रकार आता समोर आला आहे.
Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड करत राडा
वकिलाने उच्च अधिकार्याचा कसा केला पाठलाग..
35 वर्षीय सौरभ दीपंकर तेलगोटे हा सरस्वती विहार क्रमांक ७ मलकापूर अकोला येथे राहत असून महिला अधिकाऱ्याच्या दालनासमोर दिवसातून अनेक वेळा चकरा मारून काही कारण नसताना उभे राहून सतत हातवारे केले. एवढ्यावरच नाही तर चारचाकी वाहनाचा महिला अधिकाऱ्या'च्या शासकीय निवासस्थानापर्यंत पाठलाग करून हिरोगिरी केली, हा प्रकार आता वकिलाला चांगलंच महागात पडला आहे. या त्रासाला कंटाळून आता महिला अधिकारी वैतागली होती. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने चक्क वेगवेगळे नावाने अकाउंट वरून सोशल मीडियावर अश्लील मेसेज करायला सुरुवात केली.
एके दिवशी या वकिलाने महिला अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश केला. दरम्यान यावेळी सुरक्षा रक्षकाने सौरभ'ला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने सुरक्षारक्षकाला हाणामारी करून गोंधळ घातला अस पीडित महिलेने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यासह इतरही महिला अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करून त्याने अनेकदा शिवीगाळ करण्याचा प्रयत्नही केल्याची बाब समोर आली आहे.. त्यामुळे वैतागलेल्या महिला अधिकाऱ्याने पोलिसात सौरभ तेलगोटे यांच्या विरोधात (16 जुलैला) रात्री पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली.
Crime News: प्रेयसीचा फोटो स्टेटसला ठेवला, पुढच्या काही मिनिटात प्रेमाचा अंत वाईट झाला
या गंभीर बाबीची तात्काळ दाखल केलेला तक्रारीवरून बी.एन.एस कायद्याप्रमाणे विविध कलमा नुसार सौरभ विरोधात गुन्हा दाखल केला. तेलगोटे' ला काल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला (२२ जुलै) मंगळवार पर्यंत आता पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान एका महिला उच्चधिकार्याशी अशाप्रकारे मानसिक छळ केलेल्या वर्तुणुकीमुळे न्यायदानाच्या मंदिरातच रक्षकच जणू का भक्षक झाले का? असाही सवाल उपस्थित होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world