जाहिरात

Maharashtra Kirtankars: कीर्तन 'धंदा' नसावा, श्रीमंतांच्या मागे फिरू नका; कीर्तनकारांसाठी नियामवली

कीर्तनकारांचे सामाजिक आचरण स्वच्छ आणि पारदर्शक असावे, यासाठी ही आचारसंहिता मार्गदर्शक ठरणार आहे. कीर्तनकार आपल्या कीर्तन सादरीकरणात यानुसार आवश्यक बदल करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Kirtankars: कीर्तन 'धंदा' नसावा, श्रीमंतांच्या मागे फिरू नका; कीर्तनकारांसाठी नियामवली

राहुल कुलकर्णी, पुणे

Pune News: वारकरी संप्रदायात प्रबोधनाचे मुख्य माध्यमअसलेल्या कीर्तन परंपरेची पवित्रता जपण्यासाठी आळंदी येथील जोग महाराज संस्थानाने एक नवीन आचारसंहित जारी केली आहे. आजकाल कीर्तनकार आणि प्रवचनकारांकडून होणारे वादग्रस्त वक्तव्ये या पार्श्वभूमीवर संस्थेने हे पाऊल उचलले आहे.

कीर्तनकारांचे सामाजिक आचरण स्वच्छ आणि पारदर्शक असावे, यासाठी ही आचारसंहिता मार्गदर्शक ठरणार आहे. कीर्तनकार आपल्या कीर्तन सादरीकरणात यानुसार आवश्यक बदल करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

(नक्की वाचा- Indurikar Maharaj: इंदोरीकर महाराज कीर्तन सोडणार? मुलीच्या कपड्यांवर ट्रोलिंगमुळे मोठ्या निर्णयाचे संकेत)

जोग महाराज संस्थेचे नव्या आचारसंहितेतील नियम

  • ज्ञानेश्वरी, गाथा, संत वाङ्मय या ग्रंथांचा सखोल अभ्यास करीन व नंतर तो दुसऱ्यास सांगेन.
  • शुद्ध आचरण ठेवून नित्यनेमाने अखंड पंढरपूर, आळंदी व देहूची वारी करीन.
  • कीर्तन-प्रवचन करीन परंतु कीर्तनाचा धंदा करणार नाही.
  • कीर्तनाचा मोठेपणा आपल्या वक्तव्याने व आचरणाने वाढवीन.
  • विद्यार्थी म्हणून जन्मभर साधकच राहीन. बुवाबाजी करणार नाही.
  • आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, देशाचा, पोशाखाचा, कुळाचा अभिमान राखेन.
  • मोठ्या व श्रीमंत लोकांच्या मागे आशाळभूतपणे लागणार नाही.
  • सत्कर्माचे आचरण करण्यात व जमेल तितका परोपकार करण्यात जीवन घालवेन.
  • आपले कुटुंब घरापुरतेच न ठेवता मोठे करीन, बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून वागून त्यांना मदत करीन.
  • परद्रव्य व परकांता यासंबंधी वासना ठेवणार नाह
  • आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या परमार्थाच्या नावाखाली टाळण्याचा प्रयत्न करणार नाही. त्या ईश्वरसेवा समजून आनंदाने पार पाडेन.
  • सामाजिक, धार्मिक, नैतिक, अध्यात्मिक व भक्ती क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला प्रेरणा देईल.
  • मी वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहून "हे विश्वचि माझे घर" या न्यायाने 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म' या उक्ती प्रमाणे संस्कार शिबीर, कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सुसंघटीत समाज घडवून विश्वशांतीसाठी प्रयत्न करीन.
  • तन मन धनाने संस्थेला सहकार्य करीन.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com