Statue of great Bajirao Peshwa : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज शुक्रवारी 4 जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे साडेतेरा फूट उंचीचा हा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. यावेळी संबोधित करताना अमित शाह यांच्याकडून मोठी चूक झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या स्थापनेबाबत केलेले विधान वादग्रस्त ठरले आहे. शाह यांनी आपल्या भाषणात नेहरूंनी स्थापन केलेली ही संस्था इंग्रजांनीच उभी केली होती, असं म्हणत एक ऐतिहासिक चूकच केल्याची टीका होत आहे. यावेळी शाह म्हणाले, “जेव्हा इंग्रजांनी या परिसरात एनडीएचा पाया टाकला, तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती की ही जागा भारताच्या भविष्यातल्या सुरक्षेचं संस्थान बनेल.” त्यांच्या या विधानावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण एनडीएची मूळ स्थापना भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुण्याच्या खडकवासला येथे झाली हे इतिहासदृष्ट्या सिद्ध आहे.
नक्की वाचा - Pune Highway Traffic Jam: अमित शाहांच्या दौऱ्याचा पुणेकरांना फटका? अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
खरं काय आहे?
एनडीएची संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर भारतीय संरक्षण धोरणाच्या नव्या युगाची गरज म्हणून उदयाला आली. 11 डिसेंबर 1954 रोजी पंडित नेहरूंच्या हस्ते एनडीएचे औपचारिक उद्घाटन करण्यात आलं आहे.
पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदानासाठी कोणी प्रेरणा असेल तर ते म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे - अमित शाह
बाजीरावांच्या लढाईचे वैशिष्ट्य होते की ते स्वत:साठी कधीही लढले नाही ते देशासाठी आणि स्वराज्यासाठी लढत होते. मी कधी निराश झालो तर माझ्या मनात बालपणीचे शिवाजी महाराज आणि थोरल्या बाजीरावांचा विचार येतो आणि नैराश्य गायब होते. जर ते इतक्या बिकट परिस्थितीत लढले असतील तर आपण त्यांच्या तुलनेत फार सुस्थितीत आहोत. स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज पडली तेव्हा केला, स्वराज्य टीकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आआपले नैतृत्व आणि सैन्य ते नेहमी करेल आणि ऑपरेशन सिंदूर याचे उत्तम उदाहरण आहे. स्वराज्यासोबतच महान भारताची रचना ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा सगळ्या जगात, सगळ्या क्षेत्रात अव्वल असो अशा भारताची निर्मिती हे आपले लक्ष असले पाहीजे. त्यासाठी पुरुषार्थ, समर्पण आणि बलिदानासाठी कोणी प्रेरणा असेल तर ते म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे आहेत.