जाहिरात

Pune Highway Traffic Jam: अमित शाहांच्या दौऱ्याचा पुणेकरांना फटका? अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

पुण्यातील धायरी फाट्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.  मागील एक ते दीड तासांपासून पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली आहे.

Pune Highway Traffic Jam: अमित शाहांच्या दौऱ्याचा पुणेकरांना फटका? अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

Pune traffic Jam: केंद्रीय मंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि इतर बडे राजकीय नेते देखील या दौऱ्यादरम्यान अमित शाहांसोबत असणार आहे. मात्र याचा फटका पुणेकरांना बसताना दिसत आहे. पुण्यात विविध ठिकाणी अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

पुण्यातील वरजे, धायरी, कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी आहे. धायरी फाट्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.  मागील एक ते दीड तासांपासून पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले होते, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं बोललं जात आहे. 

(नक्की वाचा-  Pune News : अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान झाडाझडती, एकाकडे सापडली पिस्तुल आणि काडतुसे)

कसा असेल अमित शाहांचा दौरा?

अमित शाह सकाळपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सकाळी ११.३० वाजता बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पुणे एनडीएमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर स्पोर्ट्स अँड कन्वेंशन सेंटरचे दुपारी १२.३५ वाजता कोंढव्यातील पीजीकेएम स्कूलमध्ये उद्घाटन करणार आहेत. तसेच दुपारी २ वाजून २० मिनिटांनी अमित शाह कोंढव्याच्या खडीमशीन चौकातील बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी करतील. दुपारी ३ वाजता  PHRC या हेल्थ सिटीचे उद्घाटनही अमित शाहांचे हस्ते होणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात मुंबईप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार? विधानसभेत सरकारचं उत्तर काय?

पुण्यात वाहतुकीत बदल

बंडगार्डन : बंडगार्डन वाहतूक विभागाच्या हद्दीतील मोर ओढा ते सर्किट हाऊस चौक ते आय.बी. चौक दरम्यान असलेली एकेरी वाहतूक आवश्यकतेनुसार दुतर्फा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आली आहे.

काळेपडळ, कोंढवा, भारती विद्यापीठ परिसरातील बदल: ४ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मंतरवाडी फाटा ते खडी मशिन चौक ते कात्रज चौक या मार्गावर सर्व मालवाहतूक करणाऱ्या अवजड व स्लो मुव्हिंग वाहनांना (डंपर, मिक्सर, ट्रक, जड वाहने) प्रवेश बंदी राहणार आहे. या कालावधीत संबंधित मार्गांवर फक्त हलक्या वाहनांची वाहतूकच सुरू राहणार आहे. कात्रज, कोंढवा, काळेपडळ आणि भारती विद्यापीठ परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी या बदलाचा विचार करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com