जाहिरात

Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त

16 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. 

Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त

Amravati to Mumbai flight ticket : येत्या 16 एप्रिलपासून विदर्भातील अमरावती विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान अमरावतीहून मुंबईचा विमान प्रवास सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असणार आहे. अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेस पेक्षा स्वस्त असणार आहे. बडनेरा-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे फर्स्ट एसीच्या तिकीटासाठी प्रवाशांकडून  2750 रुपये आकारले जातात. तर अमरावती-मुंबई 72 सीटर विमानाचं तिकीट 2500 ते 3300 रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे प्रवासी विमान प्रवासाला प्राधान्य देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

मासिक पाळी सुरू असल्याने दलित विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवलं, Video समोर आल्यानंतर देशभरातून संताप

नक्की वाचा - मासिक पाळी सुरू असल्याने दलित विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवलं, Video समोर आल्यानंतर देशभरातून संताप

सध्या जरी अमरावती - मुंबई विमानाचं तिकीट कमी असले तरी भविष्यात अमरावती-मुंबई विमान प्रवासाची मागणी वाढल्यास विमानाचे तिकीट दर वाढवले जाऊ शकते, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे विमान सेवा सुरू होणार असल्याने अमरावतीकरांचे दहा तास दहा मिनिटं वाचणार आहेत. 16 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.