प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी
Sunetra Pawar Deputy Chief Minister : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली झालेल्या निधनानंतर कोण उपमुख्यमंत्री होणार याबाबत बऱ्याच चर्चा सुरू होत्या. दरम्यान याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्याची बातमी समोर आली आहे. सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील, असंही सांगितलं जात आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? l Chief Minister Devendra Fadnavis reaction
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील का?
कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून आणि भाजप म्हणून ठामपणे उभे राहू. त्यामुळे मी सध्या एवढेच सांगू शकतो की, अजितदादांचे कुटुंब असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच जो काही निर्णय होईल, त्यांना योग्य ते समर्थन आमच्याकडून दिले जाईल.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काही चर्चा झाली का?
माझ्याशी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चर्चा करून गेले आहेत. त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती काय आहे, कोणते पर्याय आहेत, याबाबत त्यांनी चर्चा केली आहे. मात्र अंतिम निर्णय त्यांचा पक्ष घेईल. त्या संदर्भात यापेक्षा अधिक माझ्याकडे माहिती नाही.
अजितदादांच्या निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार ?
गेल्या काही काळात अजितदादांनी अर्थसंकल्पाची मोठी तयारी केली होती. उद्यापासून मी स्वतः अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेवर लक्ष घालून उर्वरित काम पूर्ण करणार आहे. त्यानंतर अर्थसंकल्प कोण मांडणार, याबाबत निर्णय घेतला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world