जाहिरात

Amravati Airport : अमरावती विमानतळ नामांतर, प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज कोण आहेत?

वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांनी वेद आणि शास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या 21 व्या वर्षी गुलाबराव महाराजांनी डार्विनच्या तत्वज्ञानावर निबंध लिहिला.

Amravati Airport : अमरावती विमानतळ नामांतर, प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज कोण आहेत?
प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज

Amravati Airport : आजपासून अमरावती विमानतळ सेवा नागरिकांसाठी सुरू झालं आहे. नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. अमरावतीतून विमानसेवा सुरू झाल्यामुळे अमरावतीकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुंबईहून निघालेलं प्रवासी विमान अखेर नव्या कोऱ्या अमरावती विमानतळावर लँड झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावती विमानतळाच्या नामांतरावरुन वाद सुरू होता. अमरावतीच्या विमानतळाला डॉ. पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर, भाऊसाहेब देशमुख फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान अमरावती विमानतळाला  प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. 

प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज यांचा जन्म अमरावतीतील लोणी टाकली येथे 6 जुलै 1881 साली झाला. गुलाबराव गोंदुजी मोहोड असं त्यांचं संपूर्ण नाव. गुलाबराव महाराज नऊ महिन्यांचे असताना त्यांची दृष्टी गेली. मात्र अंधत्व आल्यानंतरही योग, ध्यास, शास्त्र, उपनिषद अशा विविध विषयांवर त्यांनी 130 ग्रंथ लिहिले आहेत. 

Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त

नक्की वाचा - Amravati Airport : रेल्वेपेक्षा विमानाने करा प्रवास, अमरावती-मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त

दृष्टी नसले तरी प्रज्ञाचक्षु...


गुलाबराव महाराजांना दृष्टी नसली तरी ते प्रज्ञाचक्षु होते. ते स्वत:ला ज्ञानेश्वरांची कन्या मानत. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांनी वेद आणि शास्त्राचा अभ्यास केला. वयाच्या 21 व्या वर्षी गुलाबराव महाराजांनी डार्विनच्या तत्वज्ञानावर निबंध लिहिला. महाराजांनी विविध विषयांवर 130 ग्रंथांची निर्मिती केली आहे. संत गुलाबराव महाराज श्री कृष्णाचे उपासक होते. त्यांनी भक्तिमार्गात गोपींप्रमाणे श्रीकृष्णाला आपलं पती मानलं होतं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: