
शुभम बायस्कार, अमरावती
Amravati Crime News : अमरावतीत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 'सफेद चावल' हा कोडवर्डने वापरून आरोपी एमडी ड्रग्जची विक्री करत होते. दोन्ही डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 38 लाखांचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
अमरावती शहरात एम.डी. ड्रग्ज या कोडनेमने हस्तकाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत हे एमडी ड्रग्ज पोहोचवले जात होते. सर्वसामान्य व्यक्तींसमोरसुद्धा ते मोबाईलवर 'सफेद चावल' आया, कितना और कहां भेजू? असं म्हणत ते अमरावती शहरातील ग्राहकांपर्यंत एमडी ड्रग्ज पुरवत असत, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
(नक्की वाचा - Pune News: क्लास वन ऑफिसरकडून घरात स्पाय कॅमेरे, पत्नीचे नको ते व्हिडीओ काढले, पुढे जे घडले ते...)
दरम्यान या प्रकरणात पकडलेल्या दोन डिलिव्हरी बॉयना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन आरोपींकडून 110 ग्रॅम MD ड्रग जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 38 लाख रुपये आहे. अमरावतीत एमडी ड्रग्ज तस्करी होऊ नये यासाठी वारंवार शहरात नाकेबंदी केली जाते.
(नक्की वाचा- Cidco Lottery : सिडकोची लॉटरी काढण्यास उशीर का होत आहे? अंदाजे तारीख आली समोर)
तसेच या गुन्हेगारांवर वेळोवेळी कारवाई केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. तसेच पालकांनी आपली मुले हे व्यसनाधीनतेकडे जात तर नाही ना याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world