Amravati Leopard Terror News: राज्यात सध्या २९ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे संकट आहे. त्याच्या हल्ल्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. बिबटे व मानव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाला ५६० कोटींचा निधी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात १८०० बिबटे ठेवण्यासाठी जंगलात रेस्क्यू सेंटर उभारण्यात येणार आहेत. तसेच बिबटे व मानव संघर्ष आता नैसर्गिक आपत्ती ठरवला जाणार आहे.
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्रात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये शिरत असल्याने शासन अस्वस्थ झाले आहे. बिबट्यांचे वाढते हल्ले विचारात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये वरिष्ठ वनाधिकारी, सचिव, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वित्त सचिव, महाव्यवस्थापक विद्युत वितरण यांच्या समवेत बैठक घेतली. त्यांनी परिस्थिती हाताळण्याचे निर्देश दिले.
Pune News: पुणेकरांनो सावधान! तुमच्या शहरातल्या 'या' भागातही आता बिबट्याचा वावर, Video आला समोर
अमरावतीत बिबट्याची दहशत
समोर आलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे, या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लाची बिबट्याने शिकार केली, तर अनेक शेतकऱ्यांना परिसरामध्ये बिबट दिसल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण पसरले आहे, त्यामुळे वनविभागाने याभागात सर्च ऑपरेशन राबवून ठसे आढळून आल्यानंतर पिंजरा लावण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची कामे ठप्प
गेल्या 8 दिवसांपासून शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांना सभोवताल बिबट दिसल्याच्या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर फक्त कोळवण भागात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे शिरजगावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतातील कामे ठप्प झाली आहे. रब्बीची पिक पेरणी, कापसाचा वेचा आणि पिकांचे ओलीत थांबले असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, या भागामध्ये ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जात आहे, मात्र अद्याप बिबट्या ड्रोन कॅमेरात अथवा वन विभागाला सापडला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world