जाहिरात

Amravati News : 'लाडक्या बहिणी' झाल्या आक्रमक, हप्ता न मिळाल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या

महानगरपालिकेची निवडणूक संपूनही लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्याने अमरावतीत लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Amravati News : 'लाडक्या बहिणी' झाल्या आक्रमक, हप्ता न मिळाल्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या

Amravati News : महानगरपालिकेची निवडणूक संपूनही लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्याने अमरावतीत लाडक्या बहिणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणीनी मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. यावेळी मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या होत्या.

सरकारने तत्काळ हप्ता द्यावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. ई केवायसीसाठी आम्हाला वेळ मिळाला नाही,सरकारने ई केवायसीची वेबसाईट आठ दिवसांमध्ये बंद केली त्यामुळे आम्ही केवायसी करू शकलो नाही असा महिलांचा आरोप आहे. 

Nagpur News : भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचले!

नक्की वाचा - Nagpur News : भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचले!

अमरावतीमध्ये जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बहि‍णींनी मोर्चा काढला. ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. पुन्हा ई केवायसी करून आम्हाला थकीत असलेले पैसे मिळावे यासाठी शेकडो महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. खात्यात पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. पैसे मिळण्याच्या मागणीसाठी लाडक्या बहिणींनी आंदोलन सुरू केलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com