जाहिरात

Amravati Scrub Typhus Case: अंगावर काळे चट्टे अन् मृत्यू, अमरावतीत नव्या रोगाचा शिरकाव, काय काळजी घ्याल?

symptoms treatment And Prevention: सतत ताप येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत स्क्रब टायफसचा संसर्ग असल्याचे निदान करण्यात आले होते.

Amravati Scrub Typhus Case: अंगावर काळे चट्टे अन् मृत्यू, अमरावतीत नव्या रोगाचा शिरकाव, काय काळजी घ्याल?
  • अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गावातील ६५ वर्षीय शेतकऱ्याचा स्क्रब टायफसमुळे मृत्यू झाला आहे.
  • स्क्रब टायफस हा ऑरिएंटिया त्सुत्सुगामुशी जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून माइट किड्याच्या चाव्याने होतो.
  • या आजाराची लक्षणे: ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, थंडी वाजणे आणि किडा चावलेल्या ठिकाणी काळसर डाग असणे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

शुभम बायस्कार, अमरावती: 

Amravati Scrub Typhus Cases: अमरावतीकरांचे टेन्शन वाढवणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. स्क्रब टायफस या संसर्गजन्य आजाराने या वर्षातील पहिला बळी अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर गावातील ६५ वर्षीय शेतकरी ठरला आहे. टिरलिंग पवार यांचा डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना सतत ताप येत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत स्क्रब टायफसचा संसर्ग असल्याचे निदान करण्यात आले होते.

'स्क्रब टायफस' म्हणजे काय? What is Scrub Typhus

'स्क्रब टायफस' हा ऑरिएंटिया त्सुत्सुगामुशी नावाच्या सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा जीवाणू गवतामध्ये आणि झुडपांमध्ये राहणाऱ्या 'माइट' नावाच्या किड्याच्या शरीरात असतो. हा कीडा चावल्यावर जीवाणू मानवी रक्तप्रवाहात जातो आणि काही दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात.  साध्या डास किंवा पिसू चावल्यासारखा हा चावा वाटतो.

Tips and Tricks to Clean Tawa: काळा तवा नव्यासारखा चमकेल! वापरा 'या' घरगुती सोप्या टीप्स

याच दुर्लक्षामुळे नंतर रुग्णाची प्रकृती गंभीर बनते. शेतकरी, कामगार, जंगलात जाणारे मजूर यांना हा किडा चावण्याची शक्यता जास्त असते. अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत स्क्रब टायफसचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यात टिरलिंग पवार यांचा २५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. 

आजाराची लक्षणे काय आहेत? | Scrub Typhus Symptoms 

काय काळजी घ्यावी?  Scrub Typhus Prevention

  • स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या
  • शेतात किंवा गवताळ प्रदेशात जाताना शूज घाला
  • पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि पँट घाला
  • ओलसर ठिकाणी राहणे टाळा
  • ओल्या मातीत खोदणे टाळा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com