जाहिरात
Story ProgressBack

आमदार किरण सरनाईक कुटुंबीयांच्या कारला अपघात 6 जणांचा मृत्यू

Amravati Teacher MLA : हा अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे.

Read Time: 2 min
आमदार किरण सरनाईक कुटुंबीयांच्या कारला अपघात 6 जणांचा मृत्यू
अकोला:

अमरावतीमधील शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघात झालेल्या गाडीमध्ये आमदार किरण सरनाईक यांचे पुतणे, पुतणी आणि नात होते. दोन गाड्या आमने-सामने धडकून हा अपघात झाला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अकोला जिल्ह्यातला पातूर शहराजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. जखमींना अकोल्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे. यामधील मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. 

शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचे कुटुंब हे वाशिम येथे जात असताना दोन वाहनांची समोरासमोर जबर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघाताच्या ठिकाणी नागरिकांची पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होता. त्यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले.

सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, पाहा Video )

या अपघातामध्ये घुवीर अरुण सरनाईक (28), अस्मिता अजिंक्य आमटे (9 महिने) , शिवानी अजिंक्य आमठे (30), सिद्धार्थ इंगळे (35) ,कपिल प्रकाश इंगळे (37), अमोल शंकर ठाकरे 35 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे. तर पियुष देशमुख वय (11) सपना देशमुख (41), श्रेयश सिद्धार्थ इंगळे 3 वर्ष हे जखमी झाले आहेत. या अपघाताचा पुढील तापस पोलिसांकडून करण्यात येत आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination