जाहिरात

Thane News: ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाक्यात सापडले पुरातन अवशेष, प्राचीन मंदीर सापडण्याची शक्यता

जुन्या शहरातील टेंभी नाक्याजवळ एक नवीन बांधकाम सुरु असताना कोरीव काम केलेले दगडी खांबाचे काही तुकडे सापडले.

Thane News: ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाक्यात सापडले पुरातन अवशेष, प्राचीन मंदीर सापडण्याची शक्यता

ठाणे: ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्याजवळ पुरातन अवशेष सापडल्याचे समोर आले आहे. जुन्या शहरातील टेंभी नाक्याजवळ एक नवीन बांधकाम सुरु असताना कोरीव काम केलेले दगडी खांबाचे काही तुकडे सापडले. या अवशेषांमुळे या ठिकाणी प्राचीन मंदिर सापडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? वाचा...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाण्यामधील टेंभी नाका परिसरात एका खासगी जागेत नवीन बांधकाम सुरू असताना कोरीव काम केलेल्या दगडी खांबांचे काही तुटलेले तुकडे सापडल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ठाणे जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाला माहिती दिली असून पुढील आठवड्यात एक पथकाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

Mumbai News : मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, भाडेवाढही होणार नाही

 हे अवशेष प्राचीन काळातील असू शकतात, असं मत काही इतिहासकारांनी व्यक्त केले आहे. याचसंदर्भात ज्येष्ठ इतिहासकार सदाशिव टेटविलकर यांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. आनंद (दिघे) आश्रमाजवळच्या टेंभी नाका परिसरातील एका खासगी जागेत जुन्या स्मारकाचे खांब असावेत असे काही तुटलेले भाग सापडले. मी घटनास्थळी जाऊन पाहणी केली नसली तरी दिलेल्या वर्णनानुसार हे अवशेष शतकानुशतके जुन्या मंदिराच्या बांधकामाचा भाग असू शकतात. जुन्या ठाणे परिसराला प्रचंड ऐतिहासिक महत्त्व आहे आणि या शोधामुळे राज्य आणि तज्ज्ञांचे लक्ष वेधले जाणे आवश्यक आहे, असं ते म्हणालेत. 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही याबाबत माहिती दिली आहे. आम्हाला या शोधाबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही ठाणे महानगरपालिकेला पुढील कार्यवाहीसाठी सूचित केले. सापडलेल्या वस्तू या पुरातत्व असल्याबाबत जाणकार माहिती देतील असंनिवासी जिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांनी सांगितले. दरम्यान, याचप्रकरणात महाराष्ट्र पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या शोधाची माहिती मिळाल्याचे आणि पुढील आठवड्यात एक पथक घटनास्थळी भेट देईल याची चौकशी करणार आहे. 

Panvel Drugs : रेल्वेतून नेले जात होते 35 कोटींचे ड्रग्ज, पनवेलमध्ये 'या' पद्धतीनं झाला पर्दाफाश

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com