जाहिरात

अनिल गोटेंच्या हाती 'शिवबंधन', धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी

धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी आपणच असणार असा दावा  केला होता. अनिल गोटे यांनी सांगितलं की,  दोन दिवसांपूर्वीच आपणास शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई येथे पोहचण्यास सांगितले होते.

अनिल गोटेंच्या हाती 'शिवबंधन', धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी

नागिंद मोरे, धुळे

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताना धुळे शहर विधानसभेसाठी अनिल गोटे यांची उमेदवारी देखील निश्चित करण्यात आली आहे. त्यांना शिवसेनेचा एबी फार्म देखील देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीची उमेदवारी आपणच असणार असा दावा  केला होता. अनिल गोटे यांनी सांगितलं की,  दोन दिवसांपूर्वीच आपणास शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई येथे पोहचण्यास सांगितले होते. मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश आणि उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचे म्हटले होते. 

(नक्की वाचा-  Nandgaon Vidhan Sabha: नाशकात महायुतीचं 'बळ' घटलं, पुतण्याच्या बंडखोरीमुळे होणार वांदे!)

त्यानुसार आज दुपारी अनिल गोटे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

(नक्की वाचा -  महायुतीत पहिली बंडखोरी? माजी केंद्रीय मंत्र्याच्या समर्थकाने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज)

शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर अनिल गोटे यांना पक्षाच्या वतीने धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील फायनल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या वतीने अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी उद्याप जाहीर झाली नसली तरी अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांचा एबी फॉर्म दाखवणारे एक छायाचित्र देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com