जाहिरात

महायुतीत पहिली बंडखोरी? माजी केंद्रीय मंत्र्याच्या समर्थकाने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

भिंवडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. स्नेहा पाटील या माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

महायुतीत पहिली बंडखोरी? माजी केंद्रीय मंत्र्याच्या समर्थकाने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
भिवंडी:

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काही ठिकाणी अजूनही चर्चा सुरू आहे. जागा आपल्यालाच मिळाली यासाठी रस्सीखेचही सुरू आहे. त्यात आता महायुतीत पहिली बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. भिंवडी ग्रामीण विधानसभा मतदार संघातून भाजपच्या स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. स्नेहा पाटील या माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. हा मतदार संघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. इथले विद्यमान आमदार शांताराम मोरे हे आहे. त्यांनी शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. मात्र शिंदे यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मोरे यांचे नाव नव्हते.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आहे. भाजपकडून स्नेहा पाटील यांनी बंडखोरी केली आहे. स्नेहा या भाजप युवती मोर्चाच्या तालुकाध्यक्ष आहेत. शिवाय त्या काल्हेर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच देखील आहेत. स्नेहा या माजी मंत्री कपील पाटील यांच्या खंद्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. स्नेहा देवेंद्र पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी संपूर्ण भिवंडी तालुका ग्रामीण मधील माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील समर्थक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठा संख्येने सहभागी झाले होते.

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला

या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे हे आमदार आहेत. त्यांनी भिवंडी ग्रामीणचे दहा वर्ष आमदारपद भूषवले आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी साथ दिली होती. मात्र शिवसेना शिंदे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत त्यांना स्थान देण्यात आले नाही. त्याच वेळी भाजपाच्या युवती मोर्चाच्या तालुकाध्यक्ष असलेल्या स्नेहा देवेंद्र पाटील यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - निलेश राणेंबाबत वैभव नाईक यांचे मोठ वक्तव्य, राणे पलटवार करणार?

विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या सोबत तालुक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य,  सरपंच  आणि  भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीमध्ये बंडखोरी आता अटळ झाली आहे असे समजले जाते.  या बंडाळीचा फटका नक्की कोणाला बसतो हे येणारा काळच ठरवणार आहे. कपील पाटील यांच्या समर्थकानेच ही बंडखोरी केल्याने शिंदे सेनेचे टेन्शन मात्र वाढणार आहे. त्यामुळे ही बंडखोरी शमवण्यासाठी शिंदेंना पावलं उचलावी लागणार आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - 'पाटलाचा गेम करणार' बिष्णोईची थेट धमकी, मनोज जरांगे कोणाच्या टार्गेटवर?

अशिक्षित आमदार असल्यामुळे विधानसभेत भिवंडी ग्रामीण भागातील प्रश्न त्यांच्याकडून मांडले गेले नाहीत असा आरोप विद्यमान आमदारांवर करण्यात आले आहे. त्यामुळे या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विकास मागील 10 वर्षांपासून खुंटला आहे. फक्त पाणी आणि रस्ते हे प्रश्नच महत्वाचे नसून भिवंडी आणि वाडा या भागातील आदिवासी पाड्या वरील महिलांचे प्रश्न सुद्धा अत्यंत गंभीर आहेत. त्यांना आपण नक्कीच वाचा फोडू असे स्नेहा पाटील यांनी सांगितले. मतदार संघातील जनतेला आपल्याला पाठींबा आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे असेही स्नेहा यांनी सांगितले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com