मराठा-ओबीसी आंदोलकांमधील वाद पेटला, वडीगोद्रीत तणावाचं वातावरण

मराठा आंदोलकांची गर्दी आता वडीगोद्री येथे वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचं  वातावरण निर्माण झालं आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

मराठा आणि ओबीसी आंदोलक जालन्यातील वडीगोद्री येथे आमनेसामने आले आहे. गुरुवारी देखील वडीगोद्रीमध्ये मराठा-ओबीसी आंदोलन आमनेसामने आले होते. मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे परिसरात तणावाचं  वातावरण निर्माण झालंय. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे पाटील अंतरावाली सराटी येथे आंदोलनाला बसले आहेत. अंतरावाली सराटी येथे जाण्यासाठी वडीगोद्री येथूनच रस्ता आहे. याच वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आंदोलन करत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचे आंदोलक आमनेसामने आले आहे. 

(नक्की वाचा-  महायुतीचं जागावाटप सप्टेंबर महिनाअखेर पूर्ण होण्याची शक्यता, काही जागांचा तिढा दिल्लीत सुटणार?)

 गुरुवारी रात्री वडीगोद्री येथून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्या येथून जात होत्या. मात्र तेथे मराठा आंदोलकांच्या गाड्या पोलिसांना अडवल्या. ओबीसी आंदोलकांनी देखील गाड्या सोडण्याबाबत पोलिसांना जाब विचारला. याच मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत.

नेमकं काय घडलं? 

मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मराठा बांधव अंतरवाली सराटी येथे जात आहेत. मात्र आज पुन्हा मराठा बांधवांच्या गाड्या पोलिसांनी वडीगोद्री येथे अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी लक्ष्मण हाके ज्याठिकाणी बसले आहेत तिथेच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

(नक्की वाचा-  Maharshtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप नवरात्रीच्या आठवड्यात जाहीर होणार?)

मराठा बांधवांच्या गाड्या अडवल्या तर इथेच आंदोलनाला बसू असा इशाराही त्यांना दिला. याशिवाय मराठा बांधवं अंतरवाली सराटी येथे जात असताना ओबीसी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. त्यानंतर मराठा बांधवांनी देखील जोरदार घोषणाबाजी सुरु केली. आमच्या सोबत असा अत्याचार का? मनोज जरांगे यांना भेटण्यापासून आम्हाला का रोखलं जातंय? असा सवालही मराठा बांधवांनी उपस्थित विचारला. 

Topics mentioned in this article