संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी:
Kartiki Ekadashi 2025: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या (Vitthal) दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) आषाढी एकादशीनंतरचा (Ashadhi Ekadashi) सर्वात मोठा समजला जाणारा कार्तिकी एकादशीचा (Kartiki Ekadashi) सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्यासाठी आजपासून (रविवार, २६ ऑक्टोबर) विठ्ठलाच्या दर्शनाचे दरवाजे चोवीस तास (24 Hours Darshan) उघडण्यात आले आहेत.
व्हीआयपी कल्चरला ब्रेक:
परंपरेनुसार, या सोहळ्यासाठी मंदिरातील विठ्ठलाचा पलंग (Bed) काढून ठेवण्यात आला असून, देवाचे सर्व राजोपचार (Royal Treatment) देखील बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबा आता आपल्या भक्तांना अविरत दर्शन देणार आहे. हे चोवीस तास दर्शन ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत (Prakshal Puja) सुरू राहणार आहे.
Cyclone Montha : चक्रीवादळ मोंथामुळे कोणत्या राज्यात वादळाचे संकेत; हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
या सोहळ्याची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, आजपासून विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन (VIP Darshan) पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. चोवीस तास दर्शन सुरू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे व्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही. आषाढीनंतर पंढरपुरात होणाऱ्या या सर्वात मोठ्या कार्तिकी वारीच्या सोहळ्यामुळे आता मंदिरातील व्हीआयपी संस्कृतीला (VIP Culture) पूर्णपणे ब्रेक लागला आहे. यामुळे सामान्य वारकरी भक्तांना थेट विठ्ठलाचे सुलभ दर्शन मिळणार आहे.
वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून व्यवस्था: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यालाच (Warkari) केंद्रबिंदू मानून सुलभ दर्शनाची (Easy Darshan) व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी पत्रा शेड व दर्शनाची लांबच लांब रांग (Queue) उभी करण्यात आली आहे.
Maharashtra Rain : पुढील आठवड्यातही धो-धो; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world