
आजपासून ‘वारी' च्या वाटेवरील गावांमध्ये मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून या भागात अंमलबजावणी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालखी सोहळा ज्या ज्या मार्गाने जातील त्या गावांमध्ये तो संपूर्ण दिवस मद्य आणि मांस विक्री बंद ठेवण्यात यावी. यात्रा कालावधीत पंढरपूर परिक्षेत्रात मद्य-मांस विक्री बंद ठेवण्यात यावी आणि व्हीआयपी वाहनांना बंदी घालण्यात यावी अशा तीन मागण्या भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या होत्या. त्या तत्काळ मान्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागीय आयुक्त, पुणे यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता प्रशासनाने आजपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या आदेशानंतर आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
नक्की वाचा - Pune Palkhi 2025 Live Check : संत तुकाराम महाराजांची पालखी मगरपट्टा पुलावरुन वैभव थिएटरजवळ
दोन्ही पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ...
तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी (Tukaram Maharaj Palkhi and Dnyaneshwar Mauli Palkhi) दोन दिवस पुण्यात मुक्कामी होती. अखेर आज (22 जून) सकाळी दोन्ही पालख्या आपल्या पुढील मुक्कामासाठी रवाना झाल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवेघाटातून सासवड मार्गे जाईल. यंदा दिवेघाटातील टेकडीवर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव टेकडीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वारीतील सर्वात मोठा टप्प्यासाठी रवाना झाल्या आहेत. यंदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडला असेल. त्यानुसार, पुणे ते सासवड असा 32 किलोमीटरचा मार्ग वारकरी पार करतील. हा प्रवास काहीसा कठीण असला तरी वारकरी माऊलींचं नाव घेत एक एक पाऊल टाकत जात असतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world