
पंढरपूर:
संकेत कुलकर्णी
कुठले आमंत्रण नाही, किंवा निमंत्रण नाही. जून महिना आला की महाराष्ट्रातील तमाम वारकरी विठ्ठल भक्तांना ओढ लागतो तो पंढरपूरच्या वारीचा. याच पंढरपूरच्या पायी वारीच्या सोहळ्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. 18 जून रोजी संत तुकाराम महाराजांच्या, तर 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान आहे. एकूण 18 दिवसाच्या या प्रवासात, गोल रिंगण, उभे रिंगण असे वारकरी खेळ आनंदाने खेळतात. हरिनामाचा जयघोष करत पालखी सोहळा पंढरपूरला जाणार आहे. या वारीचे वेळापत्रक आता समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025
- 19 /06/2025 माऊली पालखी प्रस्थान आळंदी
- 20/06/2025 आळंदी ते पुणे, 29 कि.मी
- 21/06/2025 पुणे मुक्काम
- 22/06/2025 पुणे ते सासवड, 32 कि.मी
- 23/06/2025 सासवड मुक्काम
- 24/06/2025 सासवड ते जेजुरी, 16 कि.मी
- 25 /06/2025 जेजुरी ते वाल्हे, 12 कि.मी
- 26 /06/2025 वाल्हे ते लोणंद, 20 कि.मी
- माऊलींना निरास्मान
- 27/06/2025 लोणंद ते तरडगाव, 08 कि.मी
- 28/06/2025 तरडगाव ते फलटण, 21 कि.मी
- 29/06/2025 फलटण ते बरड, 18 कि.मी
- 30/06/2025 बरड ते नातेपुते, 21 कि.मी
- बरड येथे गोल रिंगण
- 01/07/2025 नातेपुते ते माळशिरस, 18 कि.मी
- सदाशिवनगर येथे गोल रिंगण
- 02/07/2025 माळशिरस ते वेळापूर, 19 कि.मी
- खुडूस येथे गोळ रिंगण
- 03/07/2025 वेळापूर ते भंडी शेगाव, 21 कि.मी
- ठाकूर बुवा समाधी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा
- 04/07/2025 भंडी शेगाव ते वाखरी, 10 कि.मी
- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
- 05/07/2025 वाखरी ते पंढरपूर, प्रवास व पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम
- वाखरी येथे गोल रिंगण
- 06/07/2025 देवशयनी आषाढी एकादशी
- 10 /07/2025 पंढरपुरातून आळंदीकडे परतीचा प्रवास
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक 2025
- 18 जून : प्रस्थान आणि इनामदार वाड्यात मुक्काम
- 19 जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
- 20 जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
- 21 जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
- 22 जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
- 23 जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
- 24 जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
- 25 जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
- 26 जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
- 27 जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
- 28 जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
- बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
- 29 जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
- इंदापूर येथे गोल रिंगण
- 30 जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
- 1 जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम
- निरास्मान आणि अकलूज येथे गोल रिंगण
- 2 जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
- माळीनगर येथे उभे रिंगण
- 3 जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
- 4 जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
- बाजीराव विहीर येथे उभे रिंगण
- 5 जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
- वाखरी येथे उभे रिंगण
- 6 जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
- 10 जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world