जाहिरात

Ashok Kharat: खरातचा 4 वर्षापूर्वीचा आणखी एक क्रूर कारनामा उघड! पुरावा असूनही पोलिसांकडून 'क्लीनचिट'?

Shirdi News: अशोक खरात याच्या दडपशाहीला कंटाळून चार वर्षांपूर्वी विकास दिवटे याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक आरोप मयताच्या भावाने केला आहे. सुसाईड नोटमध्ये खरातच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.

Ashok Kharat: खरातचा 4 वर्षापूर्वीचा आणखी एक क्रूर कारनामा उघड! पुरावा असूनही  पोलिसांकडून 'क्लीनचिट'?

सुनील दिवाण, शिर्डी

भोंदूबाबा अशोक खरात याचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. आता चार वर्षांपूर्वीच्या एका आत्महत्या प्रकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिर्डी येथील विकास रामदास दिवटे या तरुणाने खरातच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. मात्र, ठोस पुरावे असतानाही खरातला वाचवण्यात आल्याचा गंभीर आरोप आता मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सुसाईड नोटमध्ये काय आहे?

"मी विकास रामदास दिवटे दि. 5 / 6 / 2022 रोजी फाशी घेऊन मरत आहे. मला मारण्यास कारणीभूत नाशिक कॅप्टन खरात व माझी सासूरवाडी जबाबदर आहे. मला खरात महाराजने फोनवर धमकी दिली आहे. माझ्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग आहे. तरी मी मेल्यावर कारवाई करण्यात यावी. 4127 हा माझ्या मोबाइलचा लॉक कोड आहे", असा मजकूर मृत विकास दिवटेने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवला होता.

विकासने 5 जून रोजी ही चिठ्ठी लिहिली होती आणि त्यानंतर 9 जून रोजी त्याने जीवन संपवले. यावरून तो अनेक दिवस मानसिक दडपणाखाली होता, हे स्पष्ट होते.

(नक्की वाचा-  Dombivli News: डोंबिवली हादरली! विश्वासाने पार्टीला गेली, मात्र 3 रिक्षाचालकांनी तरुणीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त)

पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह

फिर्यादीत आणि सुसाईट नोट मध्ये खरातच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असताना देखिल चार्जशीट मधून त्याच नाव गायब करुन त्याला क्लिनचिट कशी दिली असा सवाल मयताचा भाऊ फिर्यादी राजेंद्र दिवटे याने केलाय.

मयताचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी माध्यमांसमोर येऊन पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. फिर्यादीत आणि सुसाईट नोटमध्ये अशोक खरातच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असताना देखील चार्जशीटमधून त्याचं नाव गायब करुन त्याला क्लिनचिट कशी दिली? असा सवाल देखील राजेंद्र दिवटे यांनी उपस्थित केला.

(नक्की वाचा-  Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श)

अशोक खरात सध्या इतर गुन्ह्यांत अडकला असताना, जुनी प्रकरणेही बाहेर येऊ लागली आहेत. विकास दिवटे आत्महत्या प्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com