Dombivli News: डोंबिवलीत महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका 22 वर्षीय सुरक्षा रक्षक तरुणीवर तिच्याच ओळखीच्या तीन रिक्षा चालकांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तत्परता दाखवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
पीडित तरुणी मूळची सोलापूरची रहिवासी असून ती डोंबिवलीतील एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये कामाला आहे. तिची ओळख शहरातील काही रिक्षा चालकांशी होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपींनी तिला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा येथील एका फ्लॅटवर बोलावले.
(नक्की वाचा- Arjun Tendulkar: वडील सचिन तेंडुलकर नाही तर...; हा खेळाडू आहे अर्जुनचा आदर्श)
पार्टीच्या बहाण्याने अत्याचार
पार्टी संपल्यानंतर या तिघांनीही आपल्या मैत्रीला काळिमा फासत पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून टिळकनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम यांनी तातडीने पथके रवाना केली. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना शोधून काढले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांची अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
पोलिसांना चेतन चौहान, हेमंत चौहान, उमेश वर्मा या तीन आरोपींना अटक केली आहे. हे तिघेही आरोपी डोंबिवली परिसरात रिक्षा चालवण्याचे काम करतात. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीत रिक्षा चालकांकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world