Assembly Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? या आधी कधी झाल्या होत्या निवडणुका ?

Maharashtra Election 2024 Dates : महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा होणार की नाही या बाबत मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
M
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकींची ( Assembly Election 2024 ) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये हरियाणा, झारखंड, जम्मू कश्मीर ( Assembly Election ) या राज्यांचा समावेश आहे.  मात्र, यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीची ( Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ) घोषणा होणार की नाही या बाबत मात्र अजूनही  प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पण या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा ( Assembly Election Date Announcement ) कधी झाली होती याचा आढावा आपण घेणार आहोत.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात सध्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचं महायुती सरकार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या नेतृत्वात सरकार चालवत आहेत. ही चौदावी विधानसभा असून येत्या 26 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. त्या आधी निवडणुका घेवून नवी विधानसभा स्थापन होण्याची गरज आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या निवडणुकांची चर्चा सुरु आहे. त्यामुळं महाराष्ट्रात निवडणूका कधी जाहीर होणार या सर्वांनाच प्रतिक्षा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

2019 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात  राज्यात सरकार अस्तित्वात होते. तेंव्हा 21 सप्टेंबर 2019 ला  निवडणूकांची घोषणा झाली होती.  विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर 2019 ला संपत होती. त्यानुसार 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली होती. तर 2004 मध्ये अकराव्या विधानसभेसाठी 24 ऑगस्ट 2004 ला निवडणूक जाहीर झाली आणि आचारसंहिता लागू झाली. 13 ऑक्टोबर 2004 ला मतदान झाले होते. तर  16 ऑक्टोबर 2004 ला निकाल जाहीर झाला होता. 2004 साली निवडणूक जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत 46 दिवसांचा कालावधी होता.

ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?

2009 मध्ये 12 व्या विधानसभेसाठी मतदान झालं. त्यावेळी 31 ऑगस्ट 2009 ला निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू झाली होती.  13 ऑक्टोबर 2009 ला मतदान झाले होते. तर   22 ऑक्टोबर 2009 ला निकाल जाहीर झाला होता. 2009 साली निवडणूक जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत 53 दिवसांचा अवधी होता.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  ठाकरेंची मागणी, पवारांचा कानाडोळा, नाना मात्र थेट बोलले, मविआच्या मेळाव्यात काय काय झालं?

2014 साली तेराव्या विधानसभेसाठी मतदान झालं. त्यावेळी 12 सप्टेंबर 2014 ला निवडणुका जाहीर झाल्या. त्याच दिवसापासून आचारसंहिताही लागू झाली होती. 15 ऑक्टोबर ला मतदान पार पडले होते. तर  19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. 2014 साली निवडणूक जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत 38 दिवसांचा अवधी होता. वरील सर्व तारखांचा विचार केला तर महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर च्या 45 दिवस अगोदर तारखा जाहीर होतात.  असा विचार केला तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement