विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi Pune Meeting) महाराष्ट्रभरात दौरा सुरू आहे. दरम्यान पीएम मोदी पुण्यात दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. पीएम मोदी 12 तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (12 नोव्हेंबर) पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतूक सेवा बंद असणार आहेत. तर काही ठिकाणी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
नक्की वाचा - मतदान केंद्र शोधण्यासाठी काय कराल? निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल
पंतप्रधान मोदी यांची मंगळवारी पुण्यातील स. पा. महाविद्यालयात सभा होणार आहे त्या अनुषंगाने शहरातील वाहतूक सेवेत बदल करण्यात आले आहेत. गरुड गणपती चौक ते भिडे पूल आणि झेड ब्रिज जंक्शन प्रवेश बंद राहणार आहेत. तर डेक्कनच्या बाजूने भिडे पूल मार्गावरुन येणाऱ्या वाहनांना सरळ केळकर रोडकडे प्रवेश बंद असणार आहे. त्यामुळे मंगळवारी मोदींच्या दौऱ्यावेळी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशा सूचना पुणे वाहतूक पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात विधानसभा निवडणुकीचं होम वोटिंग आजपासून सुरू
पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात असणाऱ्या डेक्कन भागात होम वोटिंग सुरू झालं आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी होम वोटिंग
सुविधा आजपासून सुरू होत आहे. 85 वयापेक्षा जास्त असलेले नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती घरबसल्या 12 डी फॉर्म भरून पोस्टर बॅलेटने मतदान करू शकणार आहेत. सकाळी साडेआठ पासून ते पाच वाजेपर्यंत होम वोटिंग प्रक्रिया सुरू असणार आहेत. यावेळी पुण्यातील रामचंद्र गोडबोले या ९४ वर्षीय काकांनी मतदानाचा हक्क बजावला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world