विधानसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. त्या दिवशी विधानसभेच्या 288 मतदार संघात एकाच दिवशी मतदान होणार आहे. मतदाना दिवशी अनेक वेळा मतदारांना आपलं मतदान केंद्र कोणतं हे समजत नाहीत. त्यांची धावपळ होते. काही जण तर या गोष्टीला कंटाळून मतदान ही करत नाही. त्याचा थेट परिणाण एकूण मतदानावर होते. त्यामुळे मतदाना आधीच मतदारांन आपलं मतदान केंद्र कुठलं आहे, याची माहिती मिळावी यासाठी निवडणूत आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी आजच आपल्या मतदान केंद्राचे ठिकाण शोधण्यासाठी मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या संकेत स्थळावर आपलं मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती मतदारांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांना सहज त्या मतदान केंद्रावर पोहोचता येईल. शिवाय मतदाना दिवशी होणारी धावपळही टाळता येणार आहे. त्यामुळे या संकेतस्थळाचा वापर सर्वच मतदारांनी करावा अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने केली आहे. या सुविधेचा फायदा सर्वांनीच घ्यावा असे आवाहनही केले आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'अमित शाह म्हणजे मुन्ना भाई MBBS मधले...' ठाकरेंनी खडे-खडे सुनावले
या बाबतीच माहिती चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे. शिवाय त्यांनी चिंचवड मतदार संघाची संपूर्ण माहितीही उपलब्ध करुन दिली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात एकूण 6 लाख 63 हजार 622 मतदार आहेत. त्यात 3 लाख 48 हजार 450 पुरुष मतदार आहेत. 3 लाख 15 हजार 115 महिला मतदार आहेत. 57 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.
ट्रेंडिंग बातमी - शहाजी बापूंच्या गडात उद्धव ठाकरेंचं 'काय झाडी काय डोंगर' सभा गाजवली
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीवेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात एकूण 6 लाख 18 हजार 245 मतदार होते. त्यात 2 लाख 90 हजार 239 महिला मतदार तर 3 लाख 27 हजार 961 पुरुष मतदार आणि 45 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 45 हजार 377 नवीन मतदारांचा नव्याने समावेश झाला आहे. असे पवार यांनी सांगितले आहे. या सर्वांनी मतदानाला जाताना आपला मतदान केंद्र कोणते हे पाहण्यासाठी आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या अधिकृत संकेतस्थळाला वापर करावा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world