मेहबूब जमादार, रायगड
मुंबईतील एका मनोरुग्णाने उरण-न्हावा शेवा पोलीस हद्दीतील अटल सेतूच्या टोल बुथ केबिनमध्ये प्रवेश करून स्वतःला बंद करून घेतले. अटल सेतूवर त्याने घातलेल्या धिंगाण्यामुळे टोल कर्मचारी अक्षरशः हैराण झाले होते. टोल कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले, पण तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर टोल कर्मचाऱ्यांनी केबिनच्या दरवाज्याची कडी तोडून दरवाजा उघडला.
(नक्की वाचा: Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडमुळे प्रवास झाला सुखकर, प्रवाशांना मिळणार हे फायदे)
पण यावेळी त्याने केलेल्या कृत्यामुळे टोल कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. मनोरुग्ण अंगावरील सर्व कपडे काढून नग्नावस्थेत केबिनमधून बाहेर पडला आणि त्याने अटल सेतूवर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली.
(नक्की वाचा: ही वाट दूर जाते, पण कुठे? कोस्टल रोड खुला झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वाहनांचा 'स्पीड' कमी)
बऱ्याच प्रयत्नांनंतर टोल कर्मचाऱ्यांनी मनोरुग्णास न्हावा शेवा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी व्यक्तीची चौकशी करून मुंबईतील नातेवाईकांना संपर्क केला असता संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली. यानंतर त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती नवी मुंबई पोलीस साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहुल यांनी दिली.
(नक्की वाचा: राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून 'एक राज्य, एक गणवेश' योजना लागू, हे आहेत नियम)
'अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू'चे जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते.