शुभम बायस्कार, अमरावती
अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार येथे नवनीत राणा यांच्या सभेदरम्यान जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. नवनीत राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत राणांच्या दिशेने येणाऱ्या खुर्च्या रोखल्या.
विशिष्ट समजातील युवकांकडून ही खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आल्याचा आरोप आहे. नवनीत राणा यांची सभा उधळण्याचाही प्रयत्न झाला. या घटनेनंतर भाजप आक्रमक झाली असून खल्लार ठाण्यात नवनीत राणा यांच्या नेतृत्वात ठिय्या करण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO
हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी नवनीत राणा आणि भाजपने केली आहे. खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा, माजी आमदार रमेश बुंदिले यांनी ठिय्या आंदोलन केलं.
नवनीत राणांचा इशारा
आम्ही शांततेत आम्ही आमचा प्रचार करत होतो. मात्र भाषणादरम्यान विचित्र पद्धतीने इशारे केले जात होते. माझ्या कार्यकर्त्यांना त्यांना समजवण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यांना अचानक आमच्यावर हल्ला केला. माझे कार्यकर्ते, अंगरक्षकांनी मला सुरक्षित तेथून बाहेर काढलं. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल केलं आहे. याप्रकरणी आज अटक झाली नाही संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.
ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली
खल्लार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच खल्लार गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याची माहिती दिली आहे.