Beed News : पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं! एसटी बसने तिघांना चिरडलं

Beed News : पाचही तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत होते. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास व्यायामासाठी घोडका राजुरी फाट्यावर आले. त्याचवेळी एका एसटी बसने तिघांना चिरडल आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

एसटी बसने तिघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. बीड-परळी रस्त्यावर असलेल्या घोडका राजुरी फाटा येथे ही घटना घडली आहे. अपघातात तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस भरतीची तयारी करणारे हे तरुण सकाळी व्यायाम करण्यासाठी रस्त्यावर गेले असल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

ओम सुग्रीव घोडके वय 19 वर्षे , विराट बब्रुवान घोडके वय 18 वर्ष, सुबोध बाबासाहेब मोरे वय 19 वर्ष असे अपघातात मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही तिन्ही जण घोडके राजुरी गावचे रहिवासी होते. आदित्य लक्ष्मण घोडके आणि निखिल बळीराम डरपे हे दोन तरुण अपघातातून थोडक्यात बसवले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

(नक्की वाचा- Pune News : सावकाराच्या जाच; पत्नी आणि मुलाला संपवून पीडित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल)

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत होते. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास व्यायामासाठी घोडका राजुरी फाट्यावर आले. त्याचवेळी एका एसटी बसने तिघांना चिरडल आहे.

(नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked : सैफ प्रकरणात मोठी अपडेट, अखेर हल्लेखोराला ठाण्यातून अटक; गुन्ह्याचीही कबुली)

या घटनेमुळे घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर रक्ताचे डाग दिसत आहेत.  धुक्यामुळे बसचा अपघात झाला असावा असा अंदाज आहेत. मात्र अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article