जाहिरात

Beed Crime: बीड हादरलं! अश्लील VIDEO पाहून भयंकर कृत्य, अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार, मृत्यूनंतर सत्य समोर

पोस्टमार्टम रिपोर्टनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने हे दुष्कृत्य केल्याचे कबुल केले आहे. 

Beed Crime: बीड हादरलं! अश्लील VIDEO पाहून भयंकर कृत्य, अडीच वर्षांच्या मुलीवर अत्याचार, मृत्यूनंतर सत्य समोर

आकाश सावंत, बीड: 

Beed Crime:  बीडच्या अंबाजोगाईमध्ये दोन वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणात एक खळबळजनक खुलासा झाला आहे. सुरुवातीला पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाल्याचा समज झाला होता, मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने हे दुष्कृत्य केल्याचे कबुल केले आहे. 

अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील एका गावामध्ये धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून  दोन वर्षे पाच महिन्यांच्या चिमुरडीवर तिच्याच 15 वर्षीय नातेवाईकाने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या अडीच वर्षाच्या मुलीचा हौदात पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. 

Pune News: कृपया लक्ष द्या! पुण्यातून कोकणात जाणारा 'हा' महत्त्वाचा घाट सव्वा महिने बंद; पर्यायी मार्ग कोणते?

मात्र अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालातून अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला. डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले.  पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. तपासादरम्यान मुलीच्या आत्याचा १५ वर्षीय मुलगा तीन दिवस जेवत नव्हता आणि सतत रडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

आरोपीची कबुली

याचवरुनच पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.  आरोपीने तिला दुचाकीवर बसवून नेत अत्याचार केल्याचे कबुल केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अवघा जिल्हा सुन्न झाला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

PM Modi Meeting: देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी स्पष्ट सांगितलं, सर्व मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश

..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com