अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून बीडमध्ये DPDC ची बैठक घेण्यात येणार आहे. याशिवाय बीडमध्ये एका तरुणाला मारहाण केल्या प्रकरणी बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र बंद मागे घेण्यात आला आहे. दुसरीकडे सोलापूरच्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे.
LIVE Updates: परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीला ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देणार
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीला ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देणार.
ऑपरेशन सिंदूरचे संपूर्ण विवरण, पाकिस्तानसह अलीकडील परराष्ट्र धोरणातील घडामोडींवर चर्चा होणार.
पॅनेलला दिली जाणारी ही पहिली अधिकृत माहिती असेल. काहीच वेळात हि बैठक शुरु होणार
परराष्ट्र विषयक स्थायी समितीच्या बैठकीसाठी संसद भवन अॅनेक्समध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री, काँग्रेस खासदार राजीव शुक्ला दाखल झाले. बरोबरच AIMIM खासदार असदुद्दीन ओवैसी, भाजप खासदार नवीन जिंदाल, रवी शंकर प्रसाद आणि खासदार सतनाम सिंग संधू हेही या बैठकीसाठी उपस्थित.
भाजप खासदार आरपीएन सिंग, अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल देखील परराष्ट्र विषयक स्थायी समितीच्या बैठकीसाठी संसद भवन अॅनेक्समध्ये दाखल झाले.
LIVE Updates: मोठी बातमी विधानभवनाच्या प्रवेश द्वारावर आग
विधानभवनाच्या दारावर आग लागल्याची बातमी समोर आली आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इलेक्ट्रिक बोर्डला आग लागली. आगीची बातमी कळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही पाहणी केली.
Live Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा निर्दोष मुक्तीचा अर्ज कायम
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा निर्दोष मुक्तीचा अर्ज कायम
वाल्मीक कराडच्या अर्जावर थोड्याच वेळात निर्णय होणार
Live Update : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान नुकसानीचा आढावा घेणार
महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस नुकसानीचा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान घेणार आढावा
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह राज्याचे कृषी विभागाचे वरीष्ठ अधिकारी आढावा बैठकीला उपस्थित राहणार
- व्हीसीद्वारे दुपारी बारा वाजता होणाऱ्या या बैठकीत राज्याचे कृषिमंत्री नाशिकमधून बैठकीला उपस्थित राहणार
Live Update : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आजपासून तीन देशांच्या दौऱ्यावर
नेदरलँड, डेनमार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांना भेटणार, चर्चेत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार
एस.जयशंकर आजपासून 3 देशांच्या दौऱ्यावर
Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल..
उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल..
Live Update : मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांतला पाणीसाठा केवळ 18 टक्क्यांवर
मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांतला पाणीसाठा केवळ १८ टक्क्यांवर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धनरांमध्ये १८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहील आहे
यंदा मुंबईकरांना अवकळी पाऊस आणि वाढती उष्णता याचा सामना करावा लागला तसेच उन्हाच्या झळांचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील झाला
सध्याच्या घडीला सात धरणातील पाणीसाठा १८ टक्के असला तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट नाही
जुलै पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पालिकेने केले असून राज्य सरकारच्या कोट्यातूंसुद्धा पाणी उपलध्ब करण्यात आले आहे
मात्र ७ जून पर्यंत पाऊस मुंबईत दाखल होणार आहे जर पाऊस उशिरा आल्यास पाणीकपातीचे संकट मुंबईकरांवर ओढावू शकते
तूर्त पालिकेने पाणिकापात न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार
Live Update : अकोल्यात मुलीचा बालविवाह रोखण्यात यश; हळद झाली, पण लग्न थांबवलं..
अकोल्याच्या बाळापुर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यासाठी यश आलं.. दरम्यान, बाळापूर हद्दीतील एका गावातील विवाह थांबवण्यासाठी अॅसेस टू जस्टीस प्रकल्प व बाल कल्याण समितीने हस्तक्षेप केलाये. मुलीची हळदी, बांगड्यांचा कार्यक्रम सुरू असतानाच पथकाने कारवाई केली. पाहुणे जमलेले असताना समुपदेशन करून पालकांकडून हमीपत्र घेतले. ग्रामस्तरीय पथकाच्या मदतीने विवाह थांबवण्यात यश आले. अल्पवयीन मुलीचे भविष्य वाचवणारे हे तात्काळ पाऊल कौतुकास्पद ठरले.
Live Update : अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर तिसऱ्यांदा बीड जिल्हा दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर तिसऱ्यांदा बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून, परळीत मात्र दादा पहिल्यांदा येत आहे. परळी, अंबाजोगाई, बीड आणि गेवराई या चार मतदारसंघांत अजित पवार ११ तास असणार आहेत. विशेष म्हणजे शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानंतर बीडच वातावरण तापले असून, पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुंडगिरीची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारल्यानंतर देखील बीडमधील परळी पॅटर्न काही थांबायला तयार नाही. त्यामुळे आजचा अजित पवारांचा दौरा महत्वाचा समजला जात असून, या दौऱ्यावर अजित पवार नेमकं काय बोलतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 'विदर्भ पाणी परिषदे'च्या पोस्टरचे औपचारिक विमोचन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 'विदर्भ पाणी परिषदे'च्या पोस्टरचे औपचारिक विमोचन
- 7,8,9 जून रोजी नागपूरत होणार विदर्भ पाणी परिषद.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन.
- पाणी परिषद मध्ये ज्यात विदर्भातील जल व्यवस्थापनाशी संबंधित समस्यांवर चर्चा केली जाणार आहे.