जाहिरात

Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? व्हिडीओ व्हायरल का केला? जाब विचारताच तरुणाची बोटे छाटली

विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? व्हिडीओ व्हायरल का केला? जाब विचारताच तरुणाची बोटे छाटली

आकाश सावंत, बीड: बीडमधील मारहाणीचे प्रकार काही थांबत नसल्याचे दिसत आहे.  काही दिवसांपूर्वीच कोयता आणि सत्तुरने एका तरुणाला धमकावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल का केला? आता हा व्हिडिओ व्हायरल का केला?  हाच राग मनात धरून तरुणाच्या हाताचे बोटे छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला. याप्रकरणी चार जणांवर पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Beed News: गोट्याचा नैवेद्य म्हणजे मर्डर फिक्स? 'त्या' व्हिडीओने बीडमध्ये खळबळ

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच बीडमधून दहशतीचा आणखी एक मारहाणीची घटना घडली होती.  शेख अलीम अनिस या तरुणाला दोघेजण हातात कोयता व चतुर घेऊन धमकावत असल्याचे समोर आले होते ज्याचा व्हिडिओही समोर आला होता.  या घटनेतील मुख्य आरोपी मारहाण झालेल्या तरुणाचा मित्रच आहे. हा व्हिडिओ इतर मित्रांना का दाखवतो? याचा जाब अनिसने विचारला त्याच्या मित्राने गाडीवर बसवून अज्ञात स्थळी नेत मारहाण केल्याचे समोर आले आहे. या मारहाणीत तरुणाचे बोट छाटण्यात आले..

दरम्यान या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलीस येत आहेत. खून, दरोडा, विनयभंगासारख्या घटना ताज्या असताना आता मित्रानेच मित्राचे बोटे छाटल्याने बीड मध्ये मात्र पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

विद्यार्थ्याचं अक्षर खराब म्हणून संतापली शिक्षिका, अशी दिली शिक्षा की वाचून उडेल थरकाप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com