जाहिरात

Beed News: डोक्यावर कर्ज, कांद्याने रडवलं अन् मराठा आंदोलनात गुन्हा; बीडमधील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

अशोक डिसले असं या शेतकऱ्याचे नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे अशोक डिसले यांच्यावर मराठा आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. 

Beed News: डोक्यावर कर्ज, कांद्याने रडवलं अन् मराठा आंदोलनात गुन्हा; बीडमधील शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं

आकाश सावंत, बीड:

Beed Farmer Suicide:  कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावामुळे बळीराजा सध्या आर्थिक संकटात आहे. शेतात दिवसरात्र राबूनही उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच कांद्याला भाव मिळत नसल्याने आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने बीडमधील  वैतागवाडीच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक डिसले असं या शेतकऱ्याचे नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे अशोक डिसले यांच्यावर मराठा आंदोलनात सहभागी झाल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. 

Mumbai To Alibaug Ferry : अलिबागचा प्लॅन फिस्कटणार! मुंबई- मांडवा जलवाहतूक बंद; कारण काय?

बीडमध्ये  शेतकऱ्याची आत्महत्या 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अशोक महादेव डिसले या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने आर्थिक गणिते कोलमडली होती, त्यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे डिसले मानसिक तणावाखाली होते.
​अशोक डिसले यांनी आपल्या शेतात कांद्याचे पीक घेतले होते.

मात्र, बाजारात कांद्याचे भाव कमालीचे कोसळल्याने उत्पादनाचा खर्चही निघणे कठीण झाले होते. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने त्यांना ग्रासले होते.  महत्त्वाची बाब म्हणजे, गुन्हे दाखल होऊनही ज्या आरक्षणासाठी त्यांनी लढा दिला, त्या कुणबी प्रमाणपत्रापासून ते वंचितच राहिले. या सर्व कारणांमुळे आलेल्या निराशेपोटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Pune Railway: प्रवाशांसाठी महत्त्वाचं! दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक, 16 ट्रेन रद्द, मार्गही बदलले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com