जाहिरात

बीडमध्ये राडा! 'वंचित'च्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं, बेल्टने फटाकावलं; कारण काय?

बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

बीडमध्ये राडा! 'वंचित'च्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं, बेल्टने फटाकावलं; कारण काय?

 स्वानंद पाटील, बीड: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार सभांना जोर आला आहे. अशातच बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळे फासल्याचा तसेच चाबकाने फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपातून हा राजकीय राडा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडच्या केज मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फसत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून यामुळेच शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्य स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासले तसेच चाबकाने मारहाणही केली. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही शैलेश कांबळे यांनी सांगितले आहे. या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून याबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.

नक्की वाचा: Ashish Shelar Interview : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? आशिष शेलारांनी दिलं उत्तर

नेमकं काय घडलं? 

सचिन चव्हाण यांनी बीडच्या केज विधानसभा मतदार संघातून सुरुवातीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती. वंचितने त्यांना अधिकृत उमेदवारीही जाहीर केली होती. वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सचिन चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे, ज्याचे व्हिडिओही समोर आले. ज्यानंतर वंचितच्या स्थानिक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत चव्हाण यांना मारहाण केली. 

दरम्यान, या राड्यानंतर वंचितचे उमेदवार सचिन चव्हाण यांनी जाहीर माफीही मागितली आहे. मी अपक्ष अर्ज भरल्यानंतर मला निधीची गरज होती, मी माझ्या मित्रांकडे पैशाची मागणी केली होती. यावेळी माझ्या भाजपच्या मित्रांनी दोन लाखांची मदत केली होती. तसेच वंचितकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर दोन वेळा 50- 50 हजार रुपये दिले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तसेच माझ्याकडून चूक झाली यावर पक्ष जी कारवाई करेल, ती मला मान्य आहे, असंही सचिन चव्हाण म्हणाले. 

महत्वाची बातमी: यंदा होऊन जाऊ दे! विखेंच्या होमग्राऊंडवर थोरातांची फटकेबाजी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com