स्वानंद पाटील, बीड
Beed Parli Vaijnath Mandir: देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले परळीतील वैद्यनाथ येथील वैद्यनाथ मंदिरात देवल कमिटी आणि पुरोहित यांच्यात निर्माण झालेल्या नवीन वादामुळे भाविकांकडून प्रभू वैद्यनाथाला करण्यात येणारे अभिषेक गेल्या चार दिवसापासून बंद आहे. देशभरातून भाविक वैद्यनाथाच्या दर्शन अभिषेकासाठी मोठ्या संख्येने परळीत येत असतात. मात्र अभिषेकासाठी देण्यात येणाऱ्या पावत्या देण्यास देवस्थान ट्रस्टकडून देण्यास टाळाटाळ केल्याने हा वाद उभा टाकला आहे. तसेच ट्रस्टच्या काही जाचक अटींमुळे पुरोहित वर्ग आक्रमक झालेला दिसून येत आहे.
(नक्की वाचा: माणसांनी खचाखच भरलेली इमारत, बाहेर पडण्याची संधीच नव्हती; कुवेत अग्निशमन दलाने सांगितले-कसे जिवंत जळाले 49 लोक?)
कोणकोणत्या आहे मागण्या?
गेल्या 4 दिवसांपासून अभिषेक बंद असल्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. पण तोडगा निघेपर्यंत अभिषेक न करण्यावर पुरोहित वर्ग ठाम आहे. पुरोहित वर्गाने वैद्यनाथ मंदिर ते तहसील कार्यालय अशी पायी रॅली काढून देवल कमिटीविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळेस मोठ्या संख्येने पुरोहित वर्ग उपस्थित होता. यामध्ये मुख्यतः अभिषेकाची वेळ पूर्ववत करावी, अशी प्रमुख मागणी पुरोहित वर्गाने केली आहे. यासह शांती पूजेसाठी ओवऱ्या पूर्ववतपणे खुल्या करून देणे, पुरोहितांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून द्यावे, मंदिराची दानपेटी जबरदस्तीने पुरोहितांकडून मोजून घेतली जाते, ते बंधन नसावे. सर्व पुरोहितांना ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात यावे.
(नक्की वाचा: नायक आणि खलनायकाच्या रुपकांचा खेळ; आरोप-अपमानांमुळे आंध्र प्रदेशात सुरू झाला नवा अध्याय)
काही विश्वस्तांची अरेरावी बंद करावी; अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी (11 जून 2024) देवल कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा परळी वैजनाथचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना पुरोहितांनी निवेदन दिले. तसेच जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुरोहित वर्ग 15 जूनपासून वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या निवेदनाबाबत येत्या 20 जूनला बैठक बोलावून याबाबत तोडगा काढला जाईल, असे तहसीलदार मुंडे यांनी सांगितले. असे असतानाही तोडगा निघेपर्यंत अभिषेक केले जाणार नाहीत, या भूमिकेवर पुरोहित ठाम आहेत.
देवस्थान ट्रस्टचा अभिषेक नित्यनेमाने सुरू
पहाटे 4.45 वाजता श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट कडून प्रभू वैद्यनाथाला विधिवत अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर पहाटे 5 वाजेपासून भाविक वैद्यनाथाला अभिषेक करतात. याच अभिषेकावर पुरोहितांनी सध्या देवल कमिटीच्या मनमानीमुळे बहिष्कार टाकलेला आहे. यामुळे अभिषेकासाठी आलेल्या भाविकांची गैरसौय होत आहे.
(नक्की वाचा: जीव द्यायला निघालेल्या Pawan Kalyan यांना चिरंजीवींनी कसं सावरलं? राम-लक्ष्मणासारखी आहे या भावांची जोडी)
Dhule Onion | कांद्यावर निर्यात बंदी; धुळ्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world