Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक करण्यात आली आहे. थोड्याच वेळात दोन्ही आरोपींना सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता असून त्यापैकीही एकजण पकडल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे आरोपी पोलिसांसह सीआयडीच्या रडारवर होते. अखेर या प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती देण्यात येणार आहे.
संतोष देशमुख रा.मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. त्यांनी डॉ. संभाजी वायभसे याचेकडे चौकशी करुन गोपनीय माहितगार नेमुन तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले वय 26 रा.टाकळी ता.केज व सुधिर ज्ञानोबा सांगळे (वय 23 रा. टाकळी ता.केज) यांना ताब्यात घेवुन गुन्हे अन्वेषण विभागाकडे पुढील तपासकामी ताब्यात देत आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला याआधीच अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अद्याप फरार होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यापैकी आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली असून कृष्णा आंगळे अद्याप फरार आहे.
दरम्यान,सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत चौघांची कसून चौकशी केली. यामध्ये डॉ.संभाजी वायबसे व त्याच्या वकील पत्नीसह चौघांचा समावेश आहे. डॉक्टर वायबसे याने देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला घटनेच्या दिवशी संपर्क केल्याचा व पैसे पुरविल्याची चर्चा आहे डॉक्टर दांपत्याला नांदेड येथून बीडमध्ये आणत ही चौकशी केली गेली याच चौकशीमधून आरोपींची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा - Who is Walmik Karad : कोण आहे वाल्मिक कराड? शरण आल्यानंतर राजकीय भूकंप, 10 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world