Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले

Beed Shocking Incident: बीडमध्ये एका कलियुगी मातेने आपल्या दोन निष्पाप चिमुरड्यांना बसमध्ये सोडून प्रियकरासोबत पळ काढल्याची मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

बीड जिल्ह्यामधून माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्यांना, म्हणजेच दोन लहान मुलांना एसटी बसमध्ये बेवारस सोडून दिले आणि स्वतः प्रियकरासोबत दुचाकीवरून पळून गेली.

खिशात ठेवली खोटी चिठ्ठी

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेने आपल्या दोन्ही मुलांना पंढरपूर-संभाजीनगर बसमध्ये बसवले आणि त्यांच्या खिशात एक चिठ्ठी ठेवली. या चिठ्ठीवर तिने लिहिले होते की, "या मुलांचे आई-वडील हयात नाहीत, यांना यवतमाळच्या बसमध्ये पाठवून द्या." या चिठ्ठीवर तिने तिचे वडील म्हणजेच मुलांच्या आजोबांचा मोबाईल नंबर लिहिला होता आणि ती बीडमधूनच प्रियकरासोबत स्कूटीवरून पसार झाली.

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News: प्रियकरासाठी कोट्यवधींची चोरी, प्रेयसी आंघोळीला जाताच भलतंच घडलं; प्रेमाचा भयंकर शेवट)

वाहकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

प्रवासादरम्यान बसमधील वाहकाला (कंडक्टर) ही दोन्ही लहान मुले एकटेच असल्याचे आणि रडत असल्याचे दिसून आले. संशय आल्याने वाहकाने तात्काळ या प्रकरणाची माहिती बीड पोलिसांना दिली. पोलिसांनी चिठ्ठीवरील नंबरच्या आधारे मुलांच्या आजोबांशी संपर्क साधून त्यांना बीडमध्ये बोलावून घेतले.

आजोबांना नातवांपेक्षा स्कूटीची काळजी

यवतमाळवरून जेव्हा मुलांचे आजोबा बीडमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी आपल्या रडणाऱ्या निष्पाप नातवांना जवळ घेण्याऐवजी पोलिसांकडे वेगळीच चौकशी सुरू केली. मुलीने पळून जाताना घरातून नेलेली स्कूटी आणि रोख रक्कम कुठे आहे? याचा जाब ते पोलिसांना विचारू लागले. या महिलेच्या वडिलांनी 30 एप्रिल रोजीच यवतमाळ पोलिसांत त्यांची मुलगी घरातून रोख रक्कम आणि दुचाकी घेऊन पळून गेल्याची तक्रार नोंदवली होती.

(नक्की वाचा-  Ulhasnagar Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकायचे अन्..., विठ्ठलवाडी पोलिसांकडून दोघांना अटक)

चिमुकल्यांचा सांभाळ आता 'शिशुगृहात'

आईने प्रियकरासाठी सोडले आणि आजोबांनी पैशांच्या व गाडीच्या मोहापायी स्वीकारण्यास नकार दिला. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी नाकारल्यानंतर या दोन चिमुरड्यांना प्रशासनाने आधाराचा हात दिला आहे. सध्या या दोन्ही मुलांची रवानगी बीड येथील शासकीय 'शिशुगृहात' करण्यात आली असून तिथे त्यांचा सांभाळ केला जात आहे.
 

Topics mentioned in this article