जाहिरात

Maharashtra Politics: 'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, शिवसैनिक आक्रमक

फुके यांनी 12 तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना शैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ,असा इशारा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

Maharashtra Politics: 'शिवसेनेचा बाप मीच...', भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, शिवसैनिक आक्रमक

अभय भुटे, भंडारा: भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप आमदार परिणय फुके यांनी शिवसेना पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. शिवसेनेचा बाप मी असल्याचे विधान फुके यांनी व्यक्तव्य केले होते. यावरून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी खूप दुःखद आहे. फुके यांनी 12 तासांच्या आत त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी अन्यथा आम्ही शिवसेना शैलीत त्यांना योग्य उत्तर देऊ,असा इशारा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विश्राम भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी शिवसेना लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे बाप आहेत.अशा परिस्थितीत कोणीही जबरदस्तीने शिवसेनेचे अवैध बाप बनण्याचा प्रयत्न करू नये.नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फुके यांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ.प्रकाश मालगावे यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला सहा मते देण्याचे षड्यंत्र रचले. त्यामुळे मालगावे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.फुके यांनी शिवसेनेबद्दल अपमानास्पद भाषा वापरून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा नेत्याला आवरावे,अन्यथा शिवसेनेचा बाप कोण आहे हे आम्ही सांगू, असा इशारा त्यांनी दिला.

Shivsena News: शिंदेंचं चाललंय काय? खंडणीच्या गुन्हेगाराला दिला पक्षात प्रवेश तर हिट अँड रन प्रकरणातील...

संजय कुंभलकर म्हणाले की, 1 ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन भवनात महसूल विभागाच्या बैठकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घरकुल धारकांना वाळू कधी दिली जाईल,अशी विचारणा केली. त्याचवेळी,फुके हे भोंडेकर यांना जबरदस्तीने अडवत होते आणि त्यांचा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत होते.आमदार भोंडेकर यांच्या मुद्द्यात फुके जबरदस्तीने हस्तक्षेप करत असल्याने त्यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केल्याचे त्यांनी सांगितले.

परिणय फुके नेमके काय म्हणाले?

परिणय फुके म्हणाले, माझ्यावर अनेकांनी खापर फोडले. मी काही कोणाच्या आरोपाला उत्तर देत नाहीत. पण त्या दिवशी मला हे माहीत झाले की, कसे असते तुमच्या घरी जर पोराला चांगले मार्क मिळाले, तर कोणाचे कौतुक होते पोरगा किंवा आई. काही चांगले झाले तर कोणी केले आईने केले आणि जर काही खराब झाले तर कोणी केले, बापाने केले. त्या दिवशी मला हे पक्क माहीत झाले की शिवसेनेचाही बाप मीच आहे, असे वादग्रस्त विधान परिणय फुके यांनी केले आहे.

नक्की वाचा - Manoj Jarange Patil: जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com