जाहिरात

Shivsena News: शिंदेंचं चाललंय काय? खंडणीच्या गुन्हेगाराला दिला पक्षात प्रवेश तर हिट अँड रन प्रकरणातील...

स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेत 2015 ते 2020 या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते.

Shivsena News: शिंदेंचं चाललंय काय? खंडणीच्या गुन्हेगाराला दिला पक्षात प्रवेश तर हिट अँड रन प्रकरणातील...
पालघर:

मनोज सातवी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पालघरच्या मनोर जवळील सायलेंट रिसॉर्टमध्ये शिवसेनेची संघटनात्मक  बैठक पार पडली. या  बैठकीला पक्षाचे स्थानिक आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावीत, संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्यासह जिल्हा प्रमुख उपस्थित होते. यावेळी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणी पक्षातून  निलंबित केलेले शिवसेनेचे माजी उपनेते  राजेश शहा यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, शिवाय एकनाथ शिंदे यांचे चाललंय काय? अशी चर्चाही रंगली होती.  

याच बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी खंडणीचा गुन्हा दाखल असलेला शिवसेना ठाकरे गटाचा माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. स्वप्नील बांदेकर यांच्यासह चौघांनी एका बांधकाम  व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीच्या रकमेतील 25 लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा रचून नवघर पोलिसांनी ही कारवाई केली होती. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेत 2015 ते 2020 या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते. 

नक्की वाचा - Manoj Jarange Patil: जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटासोबत होते. बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांचा वरळीत एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू होता. या प्रकल्पाविरोधात स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. तक्रारी मागे घेण्यासाठी स्वप्नील बांदेकर याने 10 कोटींची खंडणी मागितली होती. खंडणीच्या रकमेतील 25 लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्यावतीने हिमांश शहा आला होता. भाईंदर येथील बनाना लिफ हॉटेलमध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून शहा याला अटक केली. 

नक्की वाचा - Ramdas Kadam: 'गृहराज्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी पोलिसांनीच षडयंत्र रचले', कदमांचा मोठा आरोप

त्यानंतर वसई येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली होती. शिवाय आजच्या कार्यक्रमाला माजी आमदार श्रीनिवास वनगा हे देखील सुरुवातीला व्यासपीठावर थांबण्या ऐवजी सामान्य कार्यकर्त्यांसोबत जमिनीवरच बैठक मांडली होती. तर पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विधानसभेला बंडखोरी केलेले प्रकाश निकम यांनी देखील या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे आजचा पालघर मधील शिवसेनेची संघटनात्मक बैठक आणि  कार्यकर्ता मेळावा हा येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी होता की, पक्षातील कुरबुरी आणि पक्षापासून दूर गेलेल्या नेते-पदाधिकाऱ्यांनी पक्षात पुन्हा जवळ घेऊन पक्ष एकसंघ  करण्याचा प्रयत्न होता असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com